भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर अग्रस्थानी असून त्यांना पुरेशी सुरक्षा पुरवण्याची गरज आहे, असे माजी गृह सचिव आणि भाजपचे नेते आर. के. सिंग यांनी सोमवारी सांगितले.
आर. के. सिंग यांनी सोमवारी बिहारमधील अरा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. त्या वेळी त्यांनी मोदी यांच्या जिवाला दहशतवाद्यांकडून धोका असल्याचे सांगितले. ‘‘आताच नाही, तर मी ज्या वेळी देशाचा गृह सचिव होतो, त्या वेळीही म्हणालो होतो की, मोदी यांना दहशतवादी लक्ष्य करू शकतात,’’ असे सिंग म्हणाले.