भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आपल्या फेसबुक पेजवर प्रकाशित केलेल्या संदेशात त्यांनी मोदी यांच्याकडे सत्ता दिल्यास देशात हुकूमशाही येण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.
फेसबुकवरील संदेशात शरद पवार म्हणतात, सत्ता व्यक्तिकेंद्रितांकडे गेली, तर भ्रष्ट होते आणि हुकूमशाहीकडे जाते. त्यामुळेच केवळ व्यक्तिकेंद्रित भाजपच्या नरेंद्र मोदींकडे देशाची सत्तासूत्रे सोपवू नका.
शरद पवार यांनी याआधीही भाजपवर जाहीर सभांमधून टीका केली होती. निवडणुकीआधीच पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या भाजपच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली होती. आता मोदींकडे सत्ता दिल्यास हुकूमशाही येण्याची शक्यता व्यक्त करीत त्यांनी मोदींना लक्ष्य केले आहे.