मनसेला ‘लाईटली’ घेता येणार नाही – शरद पवार

गेल्या निवडणुकीत झालेले मतदान आणि पुणे व जुन्नर या दोन ठिकाणी राज ठाकरे यांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद पाहता मनसेला ‘लाईटली’ घेता येणार नाही, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबागमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

गेल्या निवडणुकीत झालेले मतदान आणि पुणे व जुन्नर या दोन ठिकाणी राज ठाकरे यांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद पाहता मनसेला ‘लाईटली’ घेता येणार नाही, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबागमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. त्याचबरोबर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा विषय जाहीरपणे चर्चा करण्यासारखा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांची पुण्यात आणि जुन्नरमध्ये झालेली सभा मी दूरचित्रवाहिनीवर बघितली. या सभांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता मनसेला ‘लाईटली’ घेता येणार नाही. त्या पक्षाला गेल्या निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आकड्यांवरूनही हे स्पष्ट होते, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवारांची राजच्या पाठीवर कौतुकाची थाप; मात्र उद्धवला चिमटा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुकाची थाप मारली आहे. राज ठाकरे यांनी स्वतःच्या हिमतीवर पक्ष निर्माण केला आणि तो वाढवला, असे पवार यांनी म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी उद्धव यांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी स्वतःच्या हिमतीवर पक्ष वाढवला असताना उद्धव ठाकरेंना मात्र शिवसेना वारसाहक्काने मिळाल्याचे पवार यांनी म्हटले आहे. ‘फेसबुक’वरील आपल्या पेजवर शरद पवार यांनी अवघ्या काही वाक्यांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे आपले मत मांडले आहे.
ते म्हणतात, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल अनेक पत्रकार मला प्रश्न विचारतात. राज ठाकरे यांनी स्वतःच्या हिमतीवर पक्ष निर्माण केला आणि तो वाढवला, उद्धव यांना पक्ष वारसाहक्काने मिळाला; हा या दोघांमधील मूलभूत फरक आहे. यामुळे राज यांनी महायुतीत जावं किंवा मोदीला पाठींबा द्यावा की नाही, हे ठरवण्याचा अधिकार त्यांचाच आहे. राहिला प्रश्न उद्धव यांचा, तर त्यांचे वक्तव्य मला नोंद घेण्याच्याही योग्यतेचे वाटत नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sharad pawar praised raj thackeray

ताज्या बातम्या