शेती करायची ती नांगरणी करून किंवा पूर्वमशागतीची कामे करून. ही आजवरची पारंपरिक शेतीची पद्धत. तथापि, गेल्या काही वर्षांपासून संवधत शेती केली जाते. ही शेती म्हणजे काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे नेमके उत्तर द्यायचे तर नांगरणीशिवाय शेती किंवा गरजेपुरती नांगरणी होय. यालाच संवíधत शेती असे संबोधले जाते, त्याविषयी..

शेती म्हटले की डोळ्यासमोर प्रथमदर्शनी येते ती नांगरणी. पावसाची सुरुवात झाली की वा शेतीचे एखादे चित्र दाखवायचे असल्यास हटकून नांगरट करणारा शेतकरी चित्रात हमखास दिसतो. यातून शेती आणि नांगरणीचे अतूट समीकरणच पाहायला मिळते. पण या समीकरणाला छेद देणाऱ्या शेतीचे तंत्र पुढे आले आहे. किंबहुना गेली दहा वर्षे नांगरणीशिवाय शेती करण्याची किमया कोल्हापूरचे प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांनी केली आहे. राज्यभरात तिचा प्रसारही लक्षणीय प्रमाणात झाला आहे. शून्य मशागत तंत्राच्या शेतीची वाटचाल जोमात सुरू आहे. जिवाणूंकडून मशागत करून उत्तम प्रकारे शेती करता येते याची खात्री आता शेतकऱ्यांना पटली आहे.

Why minimising or cutting out alcohol is one of the best fitness hacks
मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे हेच आहे सर्वोत्तम आरोग्याचे रहस्य? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
People with diabetes Can Eat roasted or baked snacks Is this safe for blood sugar patients Need To Know What To Eat
मधुमेही रुग्णांनी ‘या’ पदार्थाचे सेवन केल्यास नियंत्रित राहील रक्तातील साखर; वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Shengdana Chutney Recipe khandeshi recipe
फक्त ५ मिनिटात करा खानदेशी पद्धतीची शेंगदाण्याची झणझणीत, लज्जतदार चटणी; साध्या जेवणाची वाढेल गोडी

शेती करायची ती नांगरणी करून किंवा पूर्वमशागतीची कामे करून. ही आजवरची पारंपरिक शेतीची पद्धत. तथापि, गेल्या काही वर्षांपासून संवर्धित शेती केली जाते. ही शेती म्हणजे काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे नेमके उत्तर द्यायचे तर नांगरणीशिवाय शेती किंवा गरजेपुरती नांगरणी होय. यालाच संवíधत शेती असे संबोधले जाते. आपल्याकडील लोकांना संवíधत शेतीचा प्रकार अपरिचित आहे. अनेकांना हा काय प्रकार आहे, संवíधत म्हणजे काय, हे उमगले नाही. पण जगभर ही चळवळ वाढू लागली आहे, हे खरे. प्रताप चिपळूणकर यांनी तर १९९० पासून टप्प्याटप्प्याने नांगरणी कमी करीत आणली आहे. सन २००५ पासून त्यांनी नांगरणीला रामराम ठोकला आहे. वेळ पडली तर गरजेपुरती नांगरणी केली जाते. या पद्धतीच्या शेतीकडे वळण्यास त्यांचा अभ्यास कारणीभूत ठरला.

संवर्धित शेतीमध्ये पिकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा मातीच्या आरोग्याशी असलेल्या संबंधाची तपासणी केली जाते. जमिनीने पिकाच्या मुळांना वाढण्यास योग्य तो वाव दिला पाहिजे. त्यास अन्नद्रव्ये आणि पाणी योग्य प्रमाणात मिळाले पाहिजे. सूक्ष्म जीवांच्या वाढीसाठी योग्य परिस्थितीत, वायुविजनासाठी योग्य इतक्या पोकळ्या, जैविक नत्र स्थिरीकरण, अन्नद्रव्ये साठवणे, गरजेप्रमाणे पिकांना उपलब्ध करणे अशा अनेक घटकांच्या एकत्रीकरणातून जमिनीची सुपीकता साकार होते. वनस्पतींचे अवशेष व पाण्याच्या त्याज्य पदार्थाचे आच्छादन करून जमीन सुपीक करण्याच्या आच्छादन तंत्राचा अभ्यास झाला. आच्छादन तंत्राचा सविस्तर खोलवर जाऊन अभ्यास केल्यानंतर आच्छादनातील पदार्थ थेट शेतात कुजत असताना त्या जमिनीची आपोआप मशागत होते, असे त्यांच्या वाचनात आले. त्यावर त्यांनी अभ्यास करून हे तंत्र प्रत्यक्ष शेतीमध्ये आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. आíथक चणचण असतानाही उधार-उसनवारी करून मशागत करण्याच्या परिस्थितीचे चटके त्यांनी सोसले होते. मशागत करण्यासाठी पॉवर टीलर खरेदी केला. इतरांच्या शेतात मशागत करण्याचा उद्योगही यातून केला. पण आता त्यांच्या शेतातील मशागत करणे बंद झाली आहे. मशागत बंद करण्याने शेती करण्याचे जमिनीला, पिकाला, शेतकऱ्याला, पर्यावरणाला व देशालाही खूपसे लाभ होतात, असे चिपळूणकर सांगतात.

मुळात शेतकरी नांगरणी का करतो, ही पद्धत कधीपासून आहे, याची माहिती असणे गरजेचे आहे. मानवाच्या उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर त्याने शेती कसण्यास सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात तो पावसाळी पिके घेत राहिला. नंतर बागायती पिकांची लागवड त्यांच्याकडून केली जाऊ लागली. उन्हाळ्यात जमिनीतील ओलावा निघून गेल्याने जमीन तापून ती कडक बनते. अशा कोरडय़ा शुष्क- तप्त जमिनीत बी पेरण्याचे तंत्र त्याला अवगत झाले. त्या काळी पेरलेल्या पिकांची मुळे वाढणे सोपे जाण्यासाठी लागवडीपूर्वी नांगरणी करण्याची प्रथा पडली असावी. हाच कित्ता पुढे गिरवला जाऊ लागला, तो आजतागायत.

संवíधत शेतीमध्ये वेगवेगळ्या संसाधनाचे संवर्धन करून शेती केली जाते. मशागतीच्या खर्चात बचत करण्याइतका लघुदृष्टीचा अर्थ यामध्ये नाही तर रासायनिक, सेंद्रिय खत, पाणी, बियाणे, मनुष्यबळ, पीक संरक्षण रसायने अशा सर्व अंगांच्या संसाधनांचा वापर कमी होणे तसेच दुसरीकडे उत्पादन वाढणे यामध्ये अपेक्षित आहे.

शेतकऱ्याला सर्वव्यापी मदत करणारी ही शेती पद्धत आहे. सर्व प्रकारच्या पिकासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या जमिनीत संवíधत शेतीतील तंत्रज्ञान वापरले जाते. भरपूर कष्ट, मशागत करून अनिश्चित असणाऱ्या पारंपरिक शेती पद्धतीच्या तुलनेत संवíधत शेतीच्या तंत्राचा वापर करणाऱ्या जगभरातील शेतकऱ्यांचा अनुभव उजवा आहे. उत्पादकता, पर्यावरण व अन्नसुरक्षा यासाठी संवर्धित शेतीचे तंत्र अधिक सरस ठरण्यास मोठा वाव आहे. संवíधत शेतीची काही मूलभूत तत्त्वे आहेत. त्यामध्ये जमिनीची धूप थांबविणे, पिकाच्या शेष भागाचे आच्छादन करणे, पाणी कार्यक्षमतेने वापरणे, ऊर्जेचा वापर कमी करणे यांचा त्यामध्ये अंतर्भाव आहे.

संवíधत शेतीच्या जोडीला जमीन तणयुक्त असण्याचा आग्रह चिपळूणकर धरतात. पाणी व अन्नद्रव्याबाबत तणे पिकांशी स्पर्धा करतात. यामुळे जमीन तणमुक्त असणे शेतकऱ्यांच्या मनात बिंबले असल्याने त्यासाठी तो हरतऱ्हेने प्रयत्नशील असतो. पण यातून जमिनीच्या सुपीकतेचे नुकसान होते हे शेतकऱ्यांच्या गावीही नसते. यातूनच शेतात तण वाढणे ही बाब जणू निषिद्ध मानली जाते. संवर्धित शेतीचा वापर जगभर होत आहे.

अमेरिका, चीन, आफ्रिकन देश, ब्राझील, अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, शेजारच्या पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश येथेही अशा पद्धतीची शेती केली जाते. १९०९ साली भारताला संवíधत शेतीच्या जागतिक अधिवेशनाच्या संयोजनपदाची संधी मिळाली होती. जगभरातील शास्त्रज्ञांनी शोधनिबंध सादर केले. आपले संशोधन व अनुभव शेतकऱ्यांसमोर मांडले. संवíधत शेतीचे पहिले अधिवेशन सन २००१ मध्ये स्पेन देशात झाले. त्यानंतर दोन वर्षांनी ब्राझीलमध्ये, नंतरच्या दोन वर्षांनी केनियामध्ये, तर १९०९ मध्ये भारतामध्ये अधिवेशन झाले. यामध्ये झालेल्या मार्गदर्शनानुसार पहिल्या टप्प्यात काही अभ्यासू शेतकरी या तंत्राकडे वळले. त्यांच्या प्रयोगाने प्रभावित झालेले अन्य शेतकरीही याचा अवलंब करू लागले. देशात आता ही पद्धत चांगलीच मूळ धरू लागली आहे. ऊस, कापूस, गहू, तांदूळ, अशा अनेक पिकांमध्ये याचा वापर होऊ लागला आहे. शून्य मशागतीवर पिके घेण्यासाठी शेतकरी जमिनीचा अभ्यास करीत आहेत. जमिनीचा सामू, निचराशक्ती, क्षारता, उत्पादनाची प्रत व खत व्यवस्थापन याकडे ते अधिक सजगपणे पाहत आहेत. हरितक्रांतीच्या प्रारंभीच्या काळात तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार खतांचा डोस वाढविल्याने शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळत गेले. नंतरच्या काळात त्यात घट होत गेली. त्यासाठी पुन्हा खताचे आणखी डोस वाढविले. पण उत्पादन पातळी खालावत राहिली. विनानांगरणी शेती केल्याने खतांची कार्यक्षमता भरपूर वाढवता येते. असा विश्वास चिपळूणकर व्यक्त करतात. शेती समस्यांवर काही प्रमाणात मात करण्यासाठी कोणताही जादा खर्च नसलेला हा मार्ग शिवारात फुलतो आहे तो मशागतीचे कष्ट न उपसता.

 मानसिकता बदलण्याची गरज

संवíधत शेती कसण्याच्या मानसिकतेवर चिपळूणकर बोट ठेवतात. आपल्याकडील तज्ज्ञ संवर्धित शेती गरजेची नाही असे मानून आहेत. खरीप पिकाच्या कापणीनंतर रब्बीसाठी मशागतीत वेळ घालवणे उत्तर भारतात गहू पिकाच्या बाबतीत परवडणारे नसल्याने संवíधत शेती ही तिकडे ठीक आहे, असे तज्ज्ञ मानतात. उलट आपल्याकडे असा प्रश्न उद्भवत नसल्याने संवíधत शेतीचा विचार आपण का करावा, अशा नकारात्मक मानसिकतेत ते असतात. रब्बी पिकासाठी तब्बल एक-दीड महिन्याचा पुरेसा अवधी असल्याने निवांतपणे मशागत करण्याचे त्यांचे गणित ठरलेले आहे. हे सूत्र बदलून यातील फायदे घ्यावेत, असे चिपळूणकर सांगतात.

– दयानंद लिपारे

 dayanandlipare@gmail.com