कुणाल लाडे

डहाणू : Navratri 2023 Marathi News शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी डहाणू तालुक्यातील विवळवेढे महालक्ष्मी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. घटस्थापना आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे महाराष्ट्र सह गुजरात आणि केंद्रशासित प्रदेशातील भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. महालक्ष्मी मंदिरात घटस्थापना करण्यात आली असून मंदिराच्या आवारात गावातील मंडळाकडून जगदंबेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंदिरात घटस्थापना आणि आंतरिक पूजा करण्यासाठी मंदिर दरवर्षी प्रमाणे पहाटे पासून दुपारी ११ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. विवळवेढे इथल्या पायथ्याशी असलेल्या मंदिर आणि गडावरील मंदिरावर भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर प्रशासनाकडून रांगेची व्यवस्था, पाणी, अपंग/ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा, सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील बाजारपेठ देखील सज्ज झाल्या असून  बाजारपेठेत खरेदीचा उत्साह दिसून येत आहे.