Diwali 2022 Calendar: लंकापती रावणाचा वध करून आणि १४ वर्षांचा वनवास भोगून भगवान श्रीराम अयोध्येत परतले. यांच्या आगमनाच्या आनंदात अयोध्यावासीयांनी तुपाचे दिवे लावून संपूर्ण अयोध्या उजळून टाकली आणि इथूनच खऱ्या अर्थाने दिवाळी सणाला सुरुवात झाली. दसऱ्यानंतर पूर्ण २१ दिवसांनी दिवाळी सणाला आरंभ होतो. दरवर्षी कार्तिक महिन्यात दिवाळी हा सण साजरा केला जातो. या दिवसांमध्ये घराघरात दिव्यांची आरास असते, आकर्षक रोषणाई, कंदील लावून सजावट केली जाते. दारात रांगोळी काढून पाहुण्यांसोबत लक्ष्मीचं स्वागत केलं जातं. तुमच्याकडेही या सगळ्या तयारीला सुरुवात झाली असेलच हो ना? तुमच्या तयारीचे नियोजन नीट व्हावे यासाठी आधी यंदाच्या दिवाळी सणातील प्रमुख सणांच्या तारखा, शुभ मुहूर्त व तिथी जाणून घेऊयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अश्विन कृष्ण द्वादशी पासून यम द्वितीया म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत हा सण साजरा केला जातो. मात्र यंदा काही तिथी एकाच दिवशी आल्याने २२ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर याकालावधीत दिवाळी साजरो होणार आहे.

धनत्रयोदशी

दिवाळीचा पहिला सण म्हणजे धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी. भगवान कुबेर व लक्ष्मीच्या पूजनाचा हा दिवस दिवाळीची सुरुवात करतो. केवळ धनाचीच नव्हे तर उत्तम आरोग्यासाठी धन्वंतरी पूजा सुद्धा याच दिवशी केली जाते यंदा २३ ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी होणार आहे.

धनत्रयोदशी शुभ मुहूर्त: रविवार, २३ ऑक्टोबर २०२२ संध्याकाळी ५:४४ ते ६:०५ पर्यंत

नरक चतुर्दशी

दिवाळीच्या अभ्यंगस्नानाचा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. यंदा सकाळी नरक चतुर्दशी व संध्याकाळी लक्ष्मीपूजन असा योग जुळून आला आहे. हे दोन्ही मुहूर्त २४ ऑक्टोबरला आहेत. लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने माता लक्ष्मीसह श्रीगणेशाचे पूजन केले जाते.नरक चतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुरचा वध करून १६ हजार कन्यांना मुक्त केले होते अशी आख्यायिका आहे.

लक्ष्मी पूजन मुहूर्त – २४ ऑक्टोबर संध्याकाळी ०६: ५३ ते ०८: १६ पर्यंत

भाऊबीज व बलिप्रतिपदा

यंदा भाऊबीज व बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा हा एकाच दिवशी साजरा होणार आहे. २६ ऑक्टोबरला या दोन्ही सणांचे मुहूर्त आहेत. दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त समजला जातो. हा दिवस पती-पत्नींसाठी हा खास असतो.

भाऊबीज शुभ मुहूर्त – २६ ऑक्टोबर दुपारी १ वाजून १८ मिनिट ते दुपारी ३ वाजून ३३ मिनिट पर्यंत

दरम्यान दिवाळीच्या काळातच २५ ऑक्टोबरला अमावस्या असल्याने या दिवशी कोणतीही तिथी नाही.

दिवाळीत ७७ रुपयांच्या EMI वर खरेदी करा नवीकोरी Bajaj CT 110X Bike; पहा भन्नाट फीचर व स्वस्त प्लॅन

(टीप- वरील लेख हा माहितीपर आहे, यात अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही)

मराठीतील सर्व लोक उत्सव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali 2022 dhantrayodashi narak chaturdashi bhaubeej check important tithi shubh muhurat and puja vidhi svs
First published on: 09-10-2022 at 18:31 IST