Navratri Unique Tradition: आंध्र प्रदेशात सुरू असलेल्या दसरा उत्सवाचा एक भाग म्हणून, देवी वासवी कन्यका परमेश्वरीचे १३५ वर्षे जुने मंदिर नवरात्रीसाठी सजवण्यात आले आहे. या मंदिरातील काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे या फोटोमधील देवतेला ६ किलो सोने व ३ किलो चांदीची आभूषणे व वस्त्रे घालण्यात आली आहेत. या दागिन्यांची किमंत तब्बल ८ कोटी रुपये आहेगोदावरी जिल्ह्यातील पश्चिमेकडे पेनुगोंडा या शहरात वासवी कन्यका परमेश्वरीचे हे मंदिर प्रसिद्ध आहे. केवळ दागिनेच नव्हे तर मंदिराच्या गाभाऱ्यात भिंतीवर नोटा चिकटवून सजावट करण्यात आली आहे.

जवळपास दोन दशकांपासून दसऱ्याच्या सोहळ्यात देवीला सोन्याने आणि नोटांची आरास करून सजवण्याची परंपरा या मंदिरात आहे. देवी महालक्ष्मीचे हे मोहक रूप पाहण्यासाठी शुक्रवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आपण व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये पाहू शकता देवीच्या मूर्तीमागे नोटांची सजावट करण्यात आली आहेत, मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार सजावटीसाठी ६ कोटी रुपयांच्या नोटांचा वापर झाला आहे. याशिवाय देवीच्या गाभाऱ्याबाहेरही नोटांच्या माळा लावण्यात आल्या आहेत.

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Maharangoli of bharadhana at Godaghat to welcome the new year
नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर भरडधान्याची महारांगोळी, सोमवारी युध्दकलेचे प्रात्यक्षिक

६ कोटी रुपये व सोन्या-चांदीची महालक्ष्मी

Navratri 2022: आदिशक्तीच्या जागरात ‘ती’ला प्रवेश नाही; नवरात्रीत ‘या’ मंदिरात महिलांना मनाई का घातली जाते?

दरम्यान, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या या पैशांच्या नोटा उत्सव सम्पल्यावर म्हणजेच नवरात्री नंतर मंदिरात जमा होणार नसून ज्यांनी हे दान केले होते त्यांनाच परत केले जाईल. याबाबत मंदिर समितीने एएनआय या वृत्तसंस्थेशी चर्चा करताना माहिती दिली. पुढे मंदिर समितीचे अधिकारी असेही म्हणतात की ही परंपरा श्रद्धाळू भाविकांनीच सुरु केली आहे. ‘देवी नवरात्री उस्तावलु’ असे या नऊ दिवसांच्या सोहळ्याचे नाव असते यात जो कोणी व्यक्ती देवीला नैवेद्य दाखवेल त्याला व्यवसाय व खाजगी आयुष्यात लाभ होतो अशी भक्तांची श्रद्धा आहे.