धुळे : जिल्हा व सत्र न्यायालयातर्फे झालेल्या लिलाव प्रक्रियेतून मिळालेले ३० तोळे सोने आणि चांदीचे दागिने मंगळवारी विश्वस्तांच्या उपस्थितीत येथील कुलस्वामिनी श्री एकविरा देवीला अर्पण करण्यात आले. सोने आणि चांदीचे एकूण ३० तोळे वजनाचे सुमारे १६ लाख ५१ हजार रुपयांचे दागिने जिल्हा व सत्र न्यायालयाने केलेल्या लिलावातून मिळवून ते श्री एकविरा देवीच्या चरणी अर्पण करण्याचा संकल्प मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी केला होता.

हेही वाचा : महिलांविषयी राज्य सरकार असंवेदनशील, अॅड रोहिणी खडसे यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तो संकल्प तब्बल ३३ वर्षांनी पूर्ण झाला. मंगळवारी मुख्य विश्वस्त गुरव यांच्या हस्ते या सर्व दागिन्यांचे विधिवत पूजन, अभिषेक करून श्री एकविरा देवीच्या चरणी अर्पण करण्यात आले. यावेळी कोषाध्यक्ष मनोहर गुरव, सचिव नंदलाल गुरव, उपाध्यक्ष संजय गुरव, सहसचिव महेश गुरव आदी उपस्थित होते