Navratri 2023 : देशात नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केला जातो. नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आश्विन शु. १ पासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्रसुद्धा म्हटले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की, नवरात्रोत्सव नऊ दिवसांचाच का असतो? याविषयी पंचांगकर्ते यांनी सविस्तर माहिती दिली.

नवरात्र या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये ‘नऊ रात्री’ असा होतो. या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जात असल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे. ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात. नवरात्रोत्सव आपण नऊ दिवस साजरा करतो आणि त्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जातो.

हेही वाचा : १६ नोव्हेंबरपर्यंत ‘या’ राशींचे लोक होणार मालामाल? मंगळदेव गोचर करताच संपत्तीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता

नवरात्र हे दिवसांवर नाही, तर तिथीवर अवलंबून

पंचागकर्ते गौरव देशपांडे सांगतात, “नवरात्र हे दिवसांवर नाही, तर तिथीवर आधारलेले आहे. प्रतिपदेपासून ते नवमी या तिथीपर्यंत हा उत्सव असतो. अनेकदा तिथीची वृद्धी होते किंवा क्षय होतो. त्यामुळे कधी हा उत्सव १० दिवसांचा, तर कधी आठ दिवसांचा असू शकतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवरात्रोत्सव नऊ दिवसांचा का?

पंचागकर्ते दा. कृ. सोमण सांगतात, “नवरात्रीत सृजन शक्तीची पूजा केली जाते. कारण- त्यावेळी धान्य घरात येते. सृजन शक्ती आणि नऊ अंक यांचं साम्य आहे. बी पेरल्यानंतर नऊ दिवसांत ते अंकुरते.
गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. त्यामुळे निर्मिती किंवा सृजन म्हटलं की नऊ. त्यामुळे नऊ या संख्येला ब्रह्मसंख्या म्हटले जाते. जास्तीत जास्त मोठा अंक नऊ आहे. म्हणूनच नवरात्र ही नऊ दिवसांची मानली जाते.”