यंदाचा पाऊस काही आठवडे विश्रांती घेऊन पुन्हा बरसताना दिसत आहे. नवी मुंबईतही गेले काही दिवस पावसाची एक तरी जोरदार सर बरसतेच. आजही (गुरुवारी) दुपारी दीड वाजेपर्यंत स्वच्छ प्रकाश होता. मात्र, अचानक निसर्गाने कुस बदलली आणि काळोख दाटून आला. पाठोपाथ प्रचंड गडगडाट करत आगमनाला जणू तोफांची सलामी देत धो धो बरसणे सुरू झाले. दसरा गेला दिवाळी तोंडावर आलीय मात्र, पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे पावसाने दसऱ्याचे सोने लुटले “आता पाऊस दिवाळीचा फराळ खाऊनच जाणार” अशा मिश्किल प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा- नवी मुंबई : दिवाळीच्या तोंडावर सुका मेवा महागला ; पिस्ता, खारीक, मनुका वधारला
मात्र, स्वच्छ प्रकाश निरभ्र आकाश असताना अचानक ढगाळ वातावरण आणि पावसाळा सुरूवात होत असल्याने नोकरदाराची तारांबळ उडत आहे. कार्यालय गाठताना स्वच्छ वातावरण असल्याने छत्री घेण्याचे विसरले आणि परतताना धो धो पाऊस पाहून तिची आठवण झाली. अशी काहीशी अवस्था सर्वांचीच होत आहे.
हेही वाचा- चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?
यात निसर्गाची किमया नवी मुंबईकर अनुभवत आहेत. आजही कोपरखैरणे नोडला खेटून असलेल्या घनसोलीत पाऊस स्वच्छ आकाश होते. तर कोपरखैरणेत धो धो पाऊस होता. हा पाऊस वाशी पर्यंत होता. मात्र, पुढे नेरूळला कमी तर सीबीडी पूर्ण कोरडी होती, असा अनुभव आकाश परांजपे या युवकाने सांगितला. मात्र, दोननंतर तेथेही जोरदार पाऊस सुरू झाला. दुसरीकडे असाच पाऊस दिवाळीपर्यंत राहिला तर दिवाळी चांगली जाणार नाही, अशी भावना कपडा व्यापारी दिनेश साटम व जनरल विक्री करणारे महेश सातपुते यांनी व्यक्त केली.