News Flash

रायगड जिल्ह्यात करोनाचे १४२ नवे रुग्ण

जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या २ हजार ७४६ वर

प्रतिकात्मक छायाचित्र

रायगडकरांची जिल्ह्यात चोवीस तासात तब्बल १४२ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या २ हजार ७४६ वर पोहोचली आहे. दिवसभरात १०३ जणांनी करोनावर मात केली आहे. तर बुधवारी उपचारा दरम्यान तिघांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात १४२ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील ९५, पनवेल ग्रामिण मधील २७, उरण मधील १०, खालापूर ४, पेण १, मुरुड १, रोहा ३ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीतील २ तर पनवेल ग्रामिण मधील  एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात १०३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील ७१९५ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ४४०१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. २७४६ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर ४८ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. १८३९ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या ७९४ करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ४१०, पनवेल ग्रामीण हद्दीतील १५८, उरण मधील ३६,  खालापूर ११, कर्जत ३८, पेण ३७, अलिबाग ४१,  मुरुड २, माणगाव १२, तळा येथील ०, रोहा २६, सुधागड ०, श्रीवर्धन ०, म्हसळा ०, महाड १५, पोलादपूर मधील ८ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्ता पर्यंत ९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले ६० हजार ९२९ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. करोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 10:29 pm

Web Title: 142 new corona patients in raigad district msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 संजय कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव
2 अकोल्यात आत्तापर्यंत ७१ करोना बाधितांचा मृत्यू
3 करोना लढाईत शासन-प्रशासनात समन्वय साधायला नेतृत्व दुबळे : फडणवीस
Just Now!
X