07 March 2021

News Flash

वऱ्हाडाला अपघात, १५ जखमी

वऱ्हाडाच्या वाहनास अमळनेर तालुक्यातील अंमळगावजवळ झालेल्या अपघातात शिरपूर तालुक्यातील पिळोदा येथील १५ जण जखमी झाले.

| March 10, 2014 02:46 am

वऱ्हाडाच्या वाहनास अमळनेर तालुक्यातील अंमळगावजवळ झालेल्या अपघातात शिरपूर तालुक्यातील पिळोदा येथील १५ जण जखमी झाले. त्यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. पिळोदा येथील वऱ्हाड टेम्पोतून पारोळा तालुक्यातील शेवगे येथे जात असताना अंमळगावजवळ या वाहनाचे पाटे तुटल्याने टेम्पो रस्त्याच्या बाजूला खोल खड्डय़ात जाऊन उलटला. या वाहनात ५० ते ६० जण होते. जखमींवर अंमळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. गंभीर चौघांना शिरपूर येथे हलविण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2014 2:46 am

Web Title: 15 injured in an accident in amalner
Next Stories
1 राणे यांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटाचा आघाडीवर परिणाम होणार नाही – पालकमंत्री
2 कोपरगाव तालुक्यात लागोपाठ तिसऱ्या दिवशी गारांचा तडाखा
3 उदयनराजे भोसले यांचा प्रचार उद्यापासून
Just Now!
X