29 October 2020

News Flash

पुण्यात दिवसभरात २१२ नवे करोनाबाधित, आठ जणांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये ९८ नवे पॉझिटिव्ह व चार जणांचा मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने २१२ करोना रुग्ण आढळल्याने, एकूण रुग्ण संख्या १२  हजार ६८६ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात ८ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ५१८ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

तर, करोनावर उपचार घेणार्‍या २५५ रुग्णांची तब्येत ठणठणीत झाल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. आज अखेर ७  हजार ६७२ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये आज नव्याने ९८ करोनाबाधित रुग्ण आढळले असून चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील बाधित रुग्णांची संख्या १  हजार ८६३ वर पोहचली असून आज ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत ५७ जणांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे. तर आजतागायत अकराशेहून अधिक जण करोनामुक्त झालेले आहेत.

नवी मुंबईत १२० नवे रुग्ण, चौघांचा मृत्यू –

नवी  मुंबईत  करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना, मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत.आज १२० नवे रुग्ण वाढले असून शहरात करोनाबाधितांची संख्या ४ हजार ९६१ झाली आहे. तर  शहरात आज  ४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, करोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या १६८ झाली आहे. शहरातील ४ हजार ९६१ रुग्णांपैकी २ हजार  ८५० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 9:45 pm

Web Title: 212 new corona patients in pune in a dayeight people died msr 87 svk 88 kjp 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 मित्रांनीच केला मित्राचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह डिझेल टाकून दोन दिवस जाळला
2 केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या
3 पुणे : एमबीए झालेल्या तरुणीचं आदर्शवत पाऊल; लॉकडाउनमध्ये केक विक्रीतून सावरला कुटुंबाचा आर्थिक डोलारा
Just Now!
X