News Flash

उस्मानाबादेत २२ आत्महत्या, केवळ सहा शेतकऱ्यांना मदत

मागील दोन महिन्यात गारपिटीने त्रस्त २२ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करत जीवनयात्रा संपविली. यातील केवळ ६ शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रस्तावास पात्र ठरविण्यात आले. उर्वरित १३जण शासकीय मदतीस

| May 19, 2014 02:52 am

मागील दोन महिन्यात गारपिटीने त्रस्त २२ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करत जीवनयात्रा संपविली. यातील केवळ ६ शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रस्तावास पात्र ठरविण्यात आले. उर्वरित १३जण शासकीय मदतीस अपात्र ठरल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.
राज्यात मागील दोन महिन्यांत गारपिटीने मोठे नुकसान केले. जिल्ह्यास याचा मोठा फटका बसला. गारपिटीमुळे आíथक अडचणीत सापडलेल्या २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यातील केवळ सहा जणांना सरकारकडून मदत मिळणार आहे. अन्य १३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून अपात्र ठरविण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकरी थकीत कर्जदार असणे गरजेचे असल्याचे शासकीय अध्यादेशात म्हटले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी नियमित कर्जदार असल्यास त्याला सरकारकडून मदत देता येत नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांबरोबरच वीज पडून जिल्ह्यात ११जणांचा मृत्यू झाला. या सर्वाना जिल्हा प्रशासनाने मदत दिली. वीज पडून ठार झालेल्या ११जणांना १६ लाख ५० हजार रुपये मदत करण्यात आली, तर अवकाळी पावसामुळे जखमी झालेल्या ७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले. पकी तीन जणांना आíथक मदत देण्यात आली. उर्वरित चार जणांना लवकरच ती मिळेल, असेही डॉ. नारनवरे यांनी सांगितले. मृत जनावरांच्या मदतीपोटी ३ लाख ३ हजार रुपयांची मदत दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 2:52 am

Web Title: 22 suicide in osmanabad only six farmer to help 2
Next Stories
1 दृष्टिहीन जोडप्याचा कोल्हापुरात विवाह
2 कारवाईतून सुटण्यासाठी सात आमदारांच्या मुखी ‘मोदी लाट’!
3 पालकमंत्री पिचड यांच्या उपस्थितीत पराभवाची कारणमीमांसा
Just Now!
X