महाराष्ट्रात करोनाचे नवे ५९७ रुग्ण आढळले आहेत तर २४ तासात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातली रुग्णसंख्या आता ९ हजार ९१५ इतकी झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज २०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात १५९३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ३२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये मुंबईत २६, पुणे शहरात ३, सोलापूरमध्ये १ औरंगाबादमध्ये १ आणि पनवेलमध्ये १ मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये २५ पुरुष तर ७ महिला आहेत. ३२ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे १७ रुग्ण आहेत. तर १५ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले आहेत. मृत्यू झालेल्या ३२ पैकी १८ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार आढळले. कोविड १९ मुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंत ४३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १ लाख ३७ हजार १५९ नमुन्यांपैकी १ लाख २६ हजार ३७६ जणांचे नमुने करोना निगेटिव्ह आले आहेत. तर ९ हजार ९१५ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यंत १ हजार ५९३ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात १ लाख ६२ हजार लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १० हजार ८१३ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.