रायगड जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने सुरु झाला आहे. आजवरची सर्वाधिक नवीन रुग्ण संख्या जिल्ह्यात नोंदविण्यात आले आहेत.

गेल्या चोवीस तासांत तब्बल ३५३ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ४ हजार ८१२ वर पोहोचली आहे. दिवसभरात ८१ जणांनी करोनावर मात केली आहे. तर गुरुवारी उपचारा दरम्यान चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ३५३ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील १८६, पनवेल ग्रामिणमधील ४७, उरणमधील १३, खालापूर ३, कर्जत ४, पेण ६, अलिबाग १९, मुरुड १३, माणगाव ७, रोहा ३३, श्रीवर्धन ७, महाड १४, पोलादपूर १ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीतील १, तर पेण, अलिबाग, मुरुड येथे प्रत्येकी १ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ८१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील १० हजार ५४० जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ५ हजार ५८० जणांचे अहवाल नकारात्मक आले. ४ हजार ८१२ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर १४८ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. २६३८ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या २ हजार ३० करोनाबाधित रुग्ण आहेत.

यात पनवेल मनपा हद्दीतील ९५०, पनवेल ग्रामिण हद्दीतील ३७५, उरणमधील ६९,  खालापूर ८८, कर्जत ७०, पेण ७५, अलिबाग ७८,  मुरुड २१, माणगाव ४७, तळा येथील ३, रोहा १०३, सुधागड ३, श्रीवर्धन २१, म्हसळा ०, महाड २३, पोलादपूरमधील ४ करोनाबाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १४४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले ९१ हजार १४४ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवीमुंबईप्रमाणे रायगड जिल्ह्यातही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.