रायगड जिल्ह्यात शुक्रवारी ५२४ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. तर २५१ जण करोनामुक्त झाले. १७ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहा हजारावर पोहोचली आहे.

जिल्ह्यात सध्या ३ हजार ७३३ करोनाचे रुग्ण आहेत. तर ६ हजार ४७७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर २७७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १० हजार ४८७ वर पोहोचली आहे. ४४० जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात ५२४ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील १३९, पनवेल ग्रामीणमधील ४२, उरणमधील १८, खालापूर ८२, कर्जत १६, पेण ९२, अलिबाग ७१, माणगाव ११, रोहा २७, श्रीवर्धन ४, म्हसळा १०, महाड ११, पोलादपूर १ रुग्णांचा समावेश आहे.

दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत ४, पनवेल ग्रामीण १, खालापूर १, पेण ४, अलिबाग ३, रोहा ३, पोलादपूर १, अशा १७ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात २५२ जण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील ३५ हजार ३९२ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ७३३ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ४३१, पनवेल ग्रामिण हद्दीतील ५०२, उरणमधील १६३, खालापूर ४१०, कर्जत ११४, पेण ४१६, अलिबाग ३८९, मुरुड ४६, माणगाव ४८, तळा येथील २, रोहा ६०, सुधागड १, श्रीवर्धन ३५, म्हसळा ५५, महाड ५४, पोलादपूरमधील ७ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ६२ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.