News Flash

रायगडमध्ये ५३१ नवे करोना रुग्ण

करोनामुळे ९०३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

(प्रतिकात्मक छायाचित्र)

गणेशोत्सवानंतर रायगड जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात करोनाचे ५३१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ४०८ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३२ हजार १२३ वर पोहोचली आहे. तर करोनामुळे ९०३ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ५३१ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील १९९ पनवेल ग्रामिणमधील ८०, उरणमधील ११, खालापूर २५, कर्जत ११, पेण ४७, अलिबाग १०१, मुरुड १, माणगाव १३, तळा ०, रोहा १८, सुधागड १४, श्रीवर्धन ०, म्हसळा ०, महाड ९, पोलादपूर २ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत २, पेण १, मुरुड १, तळा १, सुधागड १ अशा एकुण ६ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४०८ रुग्ण करोनातून पुर्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यातील १ लाख १० हजार ६१६ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ५ हजार ११९ रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ७५२, पनवेल ग्रामिण हद्दीतील ६३८, उरणमधील २०६, खालापूर २५१, कर्जत १८८, पेण ४०७, अलिबाग ६६८, मुरुड २७, माणगाव २३९, तळा येथील २६, रोहा २७७, सुधागड ९६, श्रीवर्धन ३०, म्हसळा ७, महाड २५६, पोलादपूरमधील ५१ करोनाबाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ८१ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.

कोविड केअर सेंटर मध्ये ४६७, डेडिकेटेड कोविड केअर सेंटर मध्ये ९८४, डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पीटलमध्ये ३६० तर गृह विलगीकरणात ३ हजार ३३५ लोकांवर उपचार सुरु आहेत.

अलिबाग तालुका करोनाचा नवा हॉट स्पॉट 

अलिबागमध्ये सलग चौथ्यादिवशी १०० हून अधिक करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या २ हजार ७०५ वर पोहोचली आहे. यातील १ हजार ९७० जण करोनातून पुर्ण बरे झाले आहेत. ६६८ जणांवर उपचार सुरु आहेत. तर ६७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

आमदार महेंद्र दळवींना करोनाची बाधा

अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांना करोनाची बाधा झाली असल्याचे सोमवारी निष्पन्न झाले.   यानंतर ते घरीच अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वानी सतर्क राहून, लक्षणे दिसल्यास तातडीने करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

विधानसभेच्या आधिवेशनासाठी आमदार महेंद्र दळवी मुंबईला निघाले होते. अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. मात्र यात त्यांना करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले. याबाबतची माहिती त्यांना तातडीने देण्यात आली. त्यामुळे अधिवेशनाला न जाता घरी परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला.  त्यांची प्रकृती ठिक असून त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र खबरदारी म्हणून पुढील १० दिवस घरातच अलगिकरणात राहणार असल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले आहे.

त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तातडीने करोना चाचणी करून उपचार घ्यावेत. असे आवाहन आमदार दळवी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 12:11 am

Web Title: 531 new corona patients in raigad abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अखेर मृतांच्या वारसांना शासकीय मदतीचे वाटप
2 महाराष्ट्र कर्जाच्या खाईत ढकलण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न-उद्धव ठाकरे
3 महाराष्ट्रात २० हजार १३१ नवे करोना रुग्ण, ३८० मृत्यू
Just Now!
X