राज्यात करोनाबाधितांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधिता आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही भर पडतच आहे. आज तर करोनाबाधितांच्या संख्येने आजपर्यंतचा उच्चांक गाठल्याचं दिसून आलं. दिवसभरात राज्यात तब्बल ६० हजार २१२ करोनाबाधित वाढले असून, २८१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.६६ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ५,९३,०४२ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Maharashtra Lockdown Guidelines : महाराष्ट्रात उद्या रात्रीपासून लॉकडाउन; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

दरम्यान आज ३१ हजार ६२४ रूग्ण करोनातून बरे देखील झाले. राज्यात आजपर्यंत एकूण २८,६६,०९७ करोनाबाधित रूग्ण करनोतून बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.४४ टक्के एवढे झाले आहे.

हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्यासाठी केंद्राने मदत करावी, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,२५,६०,०५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३५,१९,२०८ (१५.६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३२,९४,३९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३०,३९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १५ दिवसांसाठी लॉकडाउनच्या निर्णयावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(मंगळवार) फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना राज्यात १५ दिवसांसाठी लॉकडाउची घोषणा केली आहे. १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात पूर्णपणे संचारबंदी असणार आहे.

पुण्यात दिवसभरात ५ हजार ३१३ करोनाबाधित वाढले,५५ रूग्णांचा मृत्यू
पुणे शहरात दिवसभरात ५ हजार ३१३ करोनाबाधित वाढले असून, ५५ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ३९ हजार ८२३ झाली आहे. आजपर्यंत ५ हजार ८५६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ४ हजार ५७३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर आजअखेर २ लाख ७९ हजार ९०६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 60212 fresh covid19 cases have been reported in the state today msr
First published on: 13-04-2021 at 22:51 IST