धुळे जिल्ह्यात आतापर्यंत करोनाचे ८१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला असून महानगरपालिका हद्दीत १८ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या हद्दीत ३१ मेपर्यंत टाळेबंदी कठोर करण्यात आली आहे

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करीत मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरीच कुटुंबियांसह अदा करावी, असे आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे केले.

बाजारपेठेत, दुकानांमध्ये गर्दी झाल्यास महानगरपालिका आणि पोलिसांनी संबंधितांविरूध्द तत्काळ कार्यवाही करावी. वखार व्यावसायिकांनी ग्राहकांना घरपोच सेवा द्यावी. रविवारी संपूर्ण बाजारपेठा आणि व्यवसाय बंद राहतील. राज्य शासनाने संपूर्ण राज्यात सायंकाळी सात ते सकाळी सात या कालावधीत संचारबंदी आदेश लागू केलेले आहेत.