पहिल्या टप्प्यात २५ टक्के विक्री

दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>

महिला बचतगटांची उत्पादने विकण्याची हमखास ठिकाण म्हणजे आठवडी बाजार किंवा विक्रीप्रदर्शने. पण आता ऑनलाईन खरेदी-विक्रीचा जमाना असल्याने बचतगटही बदलले आहेत. त्यांनी आपली उत्पादने ‘ऑनलाईन’ विकण्यास सुरूवात केली आहे. बचतगटांची सुमारे २०० उत्पादने ‘अ‍ॅमेझॉन’वर आहेत. पहिल्या टप्प्यात २५ टक्के उत्पादनांची विक्रीही झाली आहे.

राज्यात महिला बचतगटांच्या चळवळीने चांगलेच मूळ धरले आहे. शहर आणि ग्रामीण भागातही बचगटांचे जाळे विकसित होत आहे. बचतगटांच्या वस्तूंना मागणीही आहे, परंतु प्रश्न आहे तो बाजाराचा. त्यासाठी पारंपरिक आठवडी बाजारात या वस्तूंची विक्री करावी लागते किंवा अधून मधून भरवल्या जाणाऱ्या प्रदर्शनांमध्ये सहभागी व्हावे लागते. परंतु ई-कॉमर्सचा काळ सुरू झाल्यामुळे बचतगटांच्या वस्तूंना विक्रीव्यासपीठ मिळाले आहे.

राज्य शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्यावतीने विशेषत: महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) डी-मार्ट, रिलायन्स आदी मॉलमध्ये बचतगटांच्या वस्तू विRीला ठेवल्या आहेत. ‘बुक माय बाई डॉट कॉम’, एमकेसीएल, (पान महाप्रदेश)

उत्साहवर्धक प्रतिसाद

तरुणाईचा खरेदीतील बदलता आणि वाढता कल लक्षात घेऊन सुरू केलेल्या या विक्री तंत्रातील उपक्रमाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. महिला बचतगटांच्या विविध वस्तूंची विक्री हातोहात होत आहे. ही विक्रीसेवा २५ ऑक्टोबरला सुरू केल्यानंतर आठवडाभरात २५ टक्के वस्तूंची विक्री झाल्याची माहिती ‘माविम’मधील सूत्रांनी दिली.

‘अ‍ॅमेझॉन’वर विक्री करण्यासाठी उत्पादनांचा दर्जा राखण्याचा प्रयत्न केला आहे. ही उत्पादने आकर्षक वेष्टनांत आहेत. या वस्तू ग्राहकांच्या गरजेप्रमाणे बार कोडसह ५०, १०० ग्रॅममध्ये उपलब्ध करण्यावर आमचा भर आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने ‘अ‍ॅमेझॉन’बरोबरची ही भागीदारी क्रांतिकारी ठरेल.

– ज्योती ठाकरे, अध्यक्षा, महिला आर्थिक विकास महामंडळ