News Flash

अमिताभ बच्चन यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

केंद्र सरकारने हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.

अमिताभ बच्चन

दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. ‘भारतीय चित्रपटसृष्टीत तुमच्या महान योगदानाबद्दल महाराष्ट्र तुम्हाला सलाम करतो’ असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या टिट्वमध्ये म्हंटले आहे.

 


अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार जाहीर होताच विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करणारे ट्विटही करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही अमिताभ बच्चन यांचे अभिनंदन केले आहे. अमिताभ बच्चन यांनी सात हिंदुस्थानी या सिनेमापासून आपली कारकीर्द सुरु केली होती. त्यानंतर त्यांच्या रुपाने भारतीय सिनेसृष्टीला एक महानायक मिळाला. आता त्यांचा सन्मान सिनेक्षेत्रातील सर्वोच्च बहुमान समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने केला जाणार आहे. केंद्र सरकारने हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 10:47 pm

Web Title: actor amitabh bachchan dada sahib phalke award cm devendra fadnavis abn 97
Next Stories
1 शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांवर गुन्हा, उद्या बारामती बंदची हाक
2 ‘वक्त जरुर बदलता है’ पवारांवर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर धनंजय मुंडे यांचा भाजपाला टोला
3 एकाच मतदारसंघासाठी ‘आप’ आणि वंचित बहुजन आघाडीने दिला सारखाच उमेदवार
Just Now!
X