विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला. नागपूर, पुणे, औरंगाबाद या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी केलं. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड हे ४९ हजार मताधिक्याने विजयी झाले. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतिश चव्हाण ५८ हजार मताधिक्याने विजयी झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

CM Eknath Shinde On Mahavikas Aghadi
“विखे पाटलांची मुळं इतकी खोलवर आहेत, की मविआचं वरून कुणी आलं तरी…”, एकनाथ शिंदेंचा नगरमधून हल्लाबोल!
Eknath Shinde, Eknath Shinde kolhapur,
कडक उन्हात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जोरदार शक्तिप्रदर्शन
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
vijay shivtare
निनावी पत्राद्वारे शिवतारेंच्या माघारीवर टीका; पवारांच्या विरोधातील ५ लाख ८० हजार मतदारांनी करायचे काय?

आणखी वाचा- वाचाळ बडबड करणार्‍यांना हा निकाल म्हणजे जबरदस्त चपराक; अजित पवारांचा भाजपाला टोला

“महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हा आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा विजय आहे. राज्यातील जनतेचा सरकारवरील विश्वास असल्याचे हे प्रतिक आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार! महाविकास आघाडीचे अन्य उमेदवारही आघाडीवर असून त्यांचा विजय लवकरच जाहीर होईल”, अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

आणखी वाचा- विधान परिषद : मविआला मिळालेल्या यशानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

या विजयानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. “हा लोकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. या यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कष्ट घेतले. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटीत प्रयत्नातून हा विजय साकारला आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं.