News Flash

जीवनावश्यक सेवा वगळता पालघर शहरातील सर्व दुकाने बंद

हजारोंचा दंड वसूल केल्यानंतरही दुकानदार टाळेबंदी नियमांना दाद देत नाहीत

संग्रहित छायाचित्र

निखिल मेस्त्री

टाळेबंदीत पालघर नगरपरिषद क्षेत्रात एका रांगेत वेगवेगळी पाच दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तरीही हे नियम धाब्यावर बसवून अनेक दुकानं सुरू असल्याचे व त्या ठिकाणी टाळेबंदीचे नियम पाळले जात नसल्याने निदर्शनास आल्याने नगरपरिषदेने ही गर्दी कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शासनाच्या आदेशानुसार काही दुकाने सुरू ठेवण्यासाठीच्या नियमानुसार पालघर नगरपरिषदेमार्फत व्यापारी व दुकानं असोसिएशनला त्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, हे नियोजन करणे अशक्य असल्याचे नगरपरिषदेला व्यापारी व दुकानदार यांच्या संस्थेमार्फत कळविण्यात आले. तसेच नगरपरिषद क्षेत्रात अनेक ठिकाणी अवास्तव व अनियमिय दुकाने उघडी राहून त्या ठिकाणी फिजिकल डिस्टंसिंगचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले. नागरिकही मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत होते. नगरपरिषदेने अशा दुकानदारांकडून हजारोंचा दंड वसूल केल्यानंतरही दुकानदार दाद देत नसल्याने नगरपरिषदेने आज हा निर्णय घेतला आहे.

या आदेशानुसार पालघर शहरातील माहीम रस्ता, कचेरी रस्ता, टेम्भोडे रस्ता, देवीसहाय रस्ता, मनोर रस्ता, मनोर माहीम हायवे रस्ता या मुख्य रस्त्यांवरील अत्यावश्यक व जीवनावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या रस्त्यावरील फेरीवाले, रस्त्याच्या कडेला बसणारे भाजी विक्रेते यांनाही बंदी घालण्यात आली आहे. येणाऱ्या टाळेबंदीसंदर्भातील पुढील मार्गदर्शक सूचना येईपर्यंत हे नियम पालघर नगरपरिषद क्षेत्रात लागू राहणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.

करोनाच्या महासंकटाचे मोठे गांभीर्य माहीत असतानाही नागरिक सर्रास घराबाहेर पडत असल्याने आता ही इतर दुकाने बंद केल्याने नागरिकांची गर्दी कमी होईल. तसेच नगरपरिषदेने दुकाने बंद करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला असल्याचे काहीं सुजाण नागरिकांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 4:59 pm

Web Title: all shops in palghar city closed except for essential services aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्राला केंद्रानं तात्काळ आर्थिक मदत करावी; बाळासाहेब थोरात यांची मागणी
2 ‘हा’ फोटो ट्विट करत निलेश राणेंनी साधला आदित्य ठाकरेंवर निशाणा
3 राज्यातून १९१ ट्रेनद्वारे अडीच लाख परप्रांतीय कामगारांना पाठवलं स्वगृही – अनिल देशमुख
Just Now!
X