23 September 2020

News Flash

‘…मग १०० दिवसांत काळा पैसा आणण्याचे आश्वासन का दिले?’

काळा पैसा भारतात परत आणण्याच्या मुद्द्यावरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सोमवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

| December 1, 2014 03:45 am

काळा पैसा भारतात परत आणण्याच्या मुद्द्यावरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सोमवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. काळा पैसा भारतात आणण्यासाठी वेळ लागणार हे माहिती होते, तर मोदींनी प्रचारावेळी १०० दिवसांत तो पैसा परत आणण्याचे आश्वासन का दिले, असा प्रश्न अण्णा हजारे यांनी विचारला आहे. केवळ मते मिळवण्यासाठीच त्यांनी काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले, असाही आरोप त्यांनी केला.
अण्णा हजारे सोमवारी नागपूर दौऱयावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी काळा पैशांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला खडे बोल सुनावले. यासंदर्भात आणि मोदी यांना पत्र लिहिल्याची आठवणही त्यांनी करून दिली. ते म्हणाले, काळा पैसा परत आणण्यासाठी सरकारी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. इतर देशांशी केलेल्या करारांवर काय तोडगा काढायचा, याचा विचार करावा लागेल. त्यामुळे हा पैसा भारतात परत आणण्यासाठी वेळ लागणार हे मोदींना माहिती होते. मग त्यांनी १०० दिवसांत काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन का दिले, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केला. परदेशात काळा पैसा असणाऱयांची नावे जाहीर करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 3:45 am

Web Title: anna hazare once again criticized narendra modi over black money issue
Next Stories
1 ‘सांसद आदर्श ग्राम’ची पहिली कार्यशाळा हिवरेबाजारला
2 ‘चित्रपट महामंडळातील कारभार भ्रष्टाचाराने बरबटलेला’
3 अतिरिक्त उत्पादनामुळे सहकारी दूध संघ अडचणीत
Just Now!
X