शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रो कबड्डीप्रमाणेच प्रो गोविंदा ही दहीहंडी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत अष्टविनायक मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. फक्त ५९ सेकंदात या ८ थरांचा मानवी मनोरा रचून या मंडळाने इतिहास घडवला. ठाण्यातील वर्तक नगर भागात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रो गोविंदा ही स्पर्धा आयोजित केली होती. या दहीहंडी स्पर्धेत १५ पथकांनी सहभाग घेतला होता. सगळ्या मंडळांपेक्षा चटकन थर लावणाऱ्या अष्टविनायक मंडळाने बाजी मारत पहिला क्रमांक पटकावला.

प्रो गोविंदा स्पर्धेचे विजेते कोण ?

प्रथम क्रमांक- अष्टविनायक मंडळ मुंबई</strong>
थर- ८
वेळ-५९ सेकंद

द्वितीय क्रमांक-बालवीर गोविंदा पथक
थर-८
वेळ १.०८ मिनिट

तृतीय क्रमांक – कोकण नगर
थर-८
वेळ १.०३ मिनिट

मुंबईत गोकुळाष्टमीचा सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. रात्री ९.३० ते १० वाजेपर्यंत गोविंदाचा उत्साह कमी झालेला दिसला नाही. ठाणे, घाटकोपर, बोरीवली या ठिकाणी अत्यंत उत्साहात दहीहंडी पार पडली. प्रो गोविंदा सारख्या स्पर्धेचा प्रयोगही गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरला ही बाब विशेष म्हणावी लागेल.