News Flash

छोटा राजनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, ठाण्यात कोणी लावला बॅनर?

ठाण्यात छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर झळकल्याने एकच खळबळ

ठाणे शहरात अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर झळकल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाण्याच्या गडकरी रंगायतन समोरील बस स्टॉपवर हा बॅनर झळकला आहे.

छोटा राजनला शुभेच्छा देणारा हा बॅनर ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे एका बस स्टॉपवर लावण्यात आला आहे. छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स ‘सी.आर. सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य’ यांच्याकडून मध्यरात्री लावण्यात आल्याची माहिती आहे. 13 जानेवारी रोजी छोटा राजनचा वाढदिवस असल्याने त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या बॅनरवर शुभेच्छुक म्हणून, प्रकाश भालचंद्र शेलटकर अध्यक्ष ठाणे शहर तसेच संगीता ताई शिंदे, ठाणे शहर महिला अध्यक्ष आणि राजाभाऊ गोळे, मुंबई शहर अध्यक्ष त्याचबरोबर हेमचंद्र उर्फ दादा मोरे संस्थापक-अध्यक्ष अशा व्यक्तींची नावे आहेत.

ठाण्यात इतक्या कुख्ययात गुंडाला शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर, पोलीस याप्रकरणी आता काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 10:51 am

Web Title: bday wishes banner for underworld don chota rajan in thane sas 89
Next Stories
1 ‘फाईलबंद’ झालेले विषय मंत्री अशोक चव्हाण यांच्या रडारवर
2 शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
3 पैसे न दिल्याने वडिलांना मुलाकडून मारहाण
Just Now!
X