अलिबाग तालुक्यातील रेवदंडा समुद्रकिनारी अडकून पडलेल्या व्हेल माशाला जीवदान देण्याचे रायगड जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असफल ठरले आहेत. महाकाय माशाला समुद्रात लोटण्यात अपयश आल्याने या माशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने पोलीस, वनविभाग आणि स्थानिकांच्या मदतीने किनाऱ्यावरच त्याला खोल खड्डय़ात पुरून त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत.
रेवदंडा समुद्रकिनारी बुधवारी सायंकाळच्या सुमारास हा भलामोठा व्हेल मासा आढळून आला. १८ ते २० टन वजनाचा हा मासा ४० फूट लांबीचा आहे. त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अतिशय दुर्मीळ असा मासा पाहण्याची संधी परिसरातील नागरिकांना मिळाली. असा मासा यापूर्वी कधीच पाहिला नव्हता असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
जखमी अवस्थेतील या माशाला वाचविण्यासाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर या माशाला खोल समुद्रात पुन्हा ढकलण्यासाठी नौदल आणि पोलीस यंत्रणेला पाचारण करण्यात आले. त्यांचे रात्रभर प्रयत्न सुरू होते. अजस्त्र माशाला उचलून समुद्रात लोटण्याचे सर्व प्रयत्न असफल ठरले. त्यामुळे पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास तो मरण पावला. वनविभागाच्या अधिकाऱ्यानी पंचनाम्याचे काम पूर्ण केले.
हा मासा इथेच पडून राहिला तर पर्यावरणाची गंभीर समस्या उभी राहू शकते हे लक्षात घेऊन प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. महसूल विभाग, पोलीस, वनविभाग या सर्व यंत्रणांचे अधिकारी तेथे हजर आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आता या माशाला रेवदंडा किनाऱ्यावरच पुरण्यात आले. त्यासाठी ४२ फूट लांबीचा ८ फूट खोल खड्डा खणण्यात आला असून जेसीबीच्या साहाय्याने माशाचा मृतदेह या खड्डय़ात टाकण्यात आला. अलिबागचे प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर, तहसीलदार प्रकाश संकपाळ, वन अधिकारी रामकृष्ण पाटील, सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्यासह विविध अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते. व्हेल माशाच्या अशा दुर्दैवी मृत्यूबाबत पर्यावरणप्रेमींनी खेद व्यक्त केला. योग्य वेळी माशाला मदत मिळाली असती तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता अशी प्रतिक्रिया काहींनी दिली; तर माशाला वाचवण्याचे सर्व प्रयत्न त्याच्या महाकाय स्वरूपामुळे फोल ठरले असल्याचे बचाव पथकातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सांगितले.

masa2

nashik, 14 Malnourished Children, Found in Trimbakeshwar Taluka, Treatment Malnourished Children , malnutrition in Trimbakeshwar Taluka, malnutrition in nashik, nashik news, Trimbakeshwar news,
त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके, ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्याचे आदेश
Ajit Pawar gave a public confession Said Hooliganism in the industrial area
अजित पवारांनी दिली जाहीर कबुली; म्हणाले, ‘औद्योगिक पट्ट्यात गुंडगिरी…’
Pune, Hinjewadi IT Park, Leopard Sighted, cub Rescued, Sugarcane Field, forest department, marathi news,
पुणे : हिंजवडी आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर नवजात बछड्या ताब्यात
pune bjp marathi news, pune bjp lok sabha seats marathi news, pune bjp loksabha election marathi news
पुणे जिल्ह्यात भाजपची कोंडी