News Flash

राज्यात १५ दिवसांची संचारबंदी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

"महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती"

संग्रहीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील जनतेशी संवाद साधताना १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली. करोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी तसंच साखळी तोडण्यासाठी ही संचारबंदी जाहीर करत असल्याचं सांगत त्यांनी सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि मदतीची माहिती दिली. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“मुख्यमंत्री महोदय बोलताना थोडा अभ्यास केलात तर बरं होईल”

“राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत,” असं ते म्हणाले आहेत.

“राज्यात निर्बंधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले, पण त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. अन्न सुरक्षा योजनेत ज्या गरीब कुटुंबांना स्वस्तात धान्य मिळते त्यांना दर महिना प्रतीकुटुंब केवळ १०५ रुपये त्यासाठी खर्च करावे लागतात. राज्य सरकारने या कुटुंबांना महिनाभरासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा केली तरी प्रत्यक्षात प्रतीकुटुंब १०५ रुपयांचाच भार सोसलेला आहे. रिक्षाचालक साधारणपणे दरमहा सरासरी दहा हजार रुपये कमवत असताना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी अवघ्या दीड हजार रुपयांची घोषणाही अशीच तोंडाला पाने पुसणारी आहे. एकूणच हातावर पोट असणाऱ्यांना मदत करण्यासाठीच्या घोषणा फसव्या आहेत,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

पुढे ते म्हणाले की, “सर्व काळजी घेऊन शक्य ते उद्योगधंदे चालू ठेवण्यास परवानगी देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परंतु, त्यांनी व्यापाराविषयी काहीही उल्लेख केला नाही. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्याचा आदेश असल्याने त्याचा जबरदस्त फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे. खरे तर पुरेशी काळजी घेऊन व्यापाऱ्यांना काम करण्याची परवानगी द्यायला हवी होती. केवळ निर्बंध लादायचे आणि फारशी मदतही करायची नाही या महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 11:09 am

Web Title: bjp chandrakant patil on maharashtra cm uddhav thackeray lockdown sgy 87
Next Stories
1 मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
2 “मुख्यमंत्री महोदय बोलताना थोडा अभ्यास केलात तर बरं होईल”
3 ३० टन प्राणवायूची गरज
Just Now!
X