सध्या करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत दिल्लीत तबलिगींचा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये सामिल झालेल्या काही तबलिगींना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंत बाहेर गेलेल्या तबलिगींमुळे करोनाच्या प्रसार वाढल्याचंही समोर आलं होतं. दरम्यान, यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून केंद्रात गृह मंत्रालयाने निजामुद्दी, दिल्लीमध्ये तबलिगी मरकजच्या इज्तेमाचं आयोजन करण्यासाठी परवानगी का दिली? अशा प्रकारचे आठ प्रश्न विचारले होते. त्यावर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुखांना काही प्रश्न विचारले आहेत.

किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी गृहमंत्र्यांना काही प्रश्न विचारले आहेत. “महाराष्ट्रातून १ हजार ५०० तबलीगी दिल्ली गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात सर्वजण सापडले, गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात ५० जण गायब आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात १०० जण गायब, तर पोलीस १५० जण फरार असल्याचा एफआयआर करतात. तबलिगींमुळे महाराष्ट्राचं किती नुकसान झालं. तब्बल २५ हॉटस्पॉट तयार झालेत. त्यांना शोधण्यात इतका उशिर का झाला,” असे सवाल करत अनिल देशमुख यांना माहिती द्यावी लागेल, असं सोमय्या म्हणाले.

काय विचारलं होतं अनिल देशमुख यांनी?

केंद्रात गृह मंत्रालयाने निजामुद्दी, दिल्लीमध्ये तबलिगी मरकजच्या इज्तेमाचं आयोजन करण्यासाठी परवानगी का दिली?

निजामुद्दीन मरकजच्या शेजारीच निजामुद्दीन पोलीस स्टेशन आहे. असं असूनही हे आयोजन थांबवलं का गेलं नाही ? यासाठी गृह मंत्रालय जबाबदारी नाही का?

ज्या पद्धतीने मरकजमध्ये इतकी गर्दी झाली व करोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव राज्यांमध्ये झाला त्याला केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का?

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोवल यांना रात्री दोन वाजता मरकजमध्ये का पाठवण्यात आलं? हे काम डोवल यांचं आहे की दिल्ली पोलीस आयुक्तांचं?

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे तबलिगचे पुढारी मौलाना साहाब रात्री दोन वाजता मरकजमध्ये काय गुप्त यंत्रणा करत होते?

अजित डोवल आणि दिल्ली पोलीस आयुक्त या दोघांनीही या विषयावर बोलणं का टाळलं?

कोणाशी याचे संबंध आहेत?

मरकजच्या आयोजनाची परवानगी तुमची..

कार्यक्रम तुम्ही रोखला नाहीत

तबलिगींशी संबंध तुमचे.. या सर्व प्रश्नांचे उत्तर देणार कोण?