पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला या वर्षात कोणताही धोका नसला तरी त्यांना काही संकटाचा सामना करावा लागू शकतो, असे भेंडवळच्या भविष्यवाणीत म्हटले आहे. तर शत्रूपासून देश सुरक्षित असेल तसेच देशाच्या आर्थिक तिजोरीत वाढ होईल, असे देखील या भविष्यवाणीत म्हटले आहे.

तीनशे वर्षांपासूनची परंपरा असलेल्या बुलढाणा येथील भेंडवळची भविष्यवाणी गुरुवारी जाहीर झाली. पाऊस, पीक, राजा, संरक्षण आणि आर्थिक अशा पाच गोष्टींचा या भविष्यवाणीत समावेश असतो. यात देशाचा राजा अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत काय भविष्यवाणी वर्तवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदा पाऊस सर्वसाधारण; भेंडवळची भविष्यवाणी

कशाच्या आधारे हे भाकित वर्तवले जाते?
भेंडवळच्या घटमांडणीत पानविडाच्या आाधारे राजाचे भविष्य सांगितले जाते. घटमांडणीत पानविडा कायम राहिल्याने राजाची गादी कायम राहणार हे स्पष्ट झाले. पण यंदा पानविडा काहीसा सुकलेला होता. त्यामुळे राजाची गादी कायम राहणार असली तरी त्याला काही संकटांचा सामना करावा लागू शकतो, असे सांगितले जाते.