26 February 2021

News Flash

लोकशाहीचे नव्हे, तर हे ठोकशाहीचे सरकार; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

करोनाचे कारण सांगत अधिवेशन लांबवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

लोकशाहीचे नव्हे, तर ठोकशाहीचे हे राज्य असून, हे राज्य तुमच्या घरचे नव्हे तर कायद्याचे आहे. लोक आता मतदानाची वाट बघत असून, भ्रमात न राहण्याचा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिला.

जनतेने तुम्हाला सत्ता दिली नव्हती. जनतेच्या मतांचा अनादर करत तुम्ही सत्तेत बसला आहे. येत्या निवडणुकीत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, अशी टीकाही त्यांनी केली. राज्यातील नामांकित व्यक्‍तींना गुन्हा दाखल करण्याची भीती दाखविण्यात येत आहे. देशद्रोहाचे काम करणाऱ्या पूर्ण संरक्षण देण्याचे कामही हे सरकार करत आहे. अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकर लता मंगेशकर यांनाही गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत आहेत, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

अजिंक्‍यतारा किल्ल्याची खासदार उदयनराजेंसोबत पाहणी केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी भाजपचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाचा कार्यक्रम असताना यावेळी शिवेंद्रसिंहराजे अनुपस्थित होते.

शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्याने भाजपने हजारो गावांत शिवगाण स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यापैकीच शिवगाण स्पर्धा हा कार्यक्रम आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी मोठा त्याग करत अजान स्पर्धा, टिपू सुलतान जयंती सह इतर स्पर्धा आयोजित केल्या. शिवजयंतीला बंदी आणि सत्तेतील सहभागी एका पक्षाचा राज्याध्यक्ष हजारोंच्या उपस्थितीत मिरवणूक काढतो. एक जण आधार मैदानावरून शेतकऱ्यांचा मोर्चा काढतो हे सर्व चालते आणि शिवाजी महाराजांच्या दर्शन घ्यायला तुम्ही बंदी घालता हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.

करोनाचे कारण सांगत अधिवेशन लांबवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून, आम्ही उपस्थित करणाऱ्या प्रश्‍नांना ते घाबरत आहेत. या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक आहे, निवडणुकीला ते घाबरत आहेत. पूजा चव्हाण, धनंजय मुंडे यांचा विषय या अधिवेशनात निघणार आहे. शेतकऱ्यांच्या नियमित कर्ज भरणाऱ्यांना माफीमध्ये पन्नास हजार रुपये देणार होते त्या लोकांना ते मिळालेले नाहीत त्याचा असा विषय निघणार आहे. राज्यामध्ये ७० हजार वीज कनेक्शन तोडली जाणार आहे यामुळे भीतीचे कारण सांगत हे अधिवेशन कमी दिवसांचे आणि लांबवत आहेत असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे राष्ट्रवादीशी जवळीक वाढत असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले शिवेंद्रसिंहराजेंनी अनेक वर्ष राष्ट्रवादीसोबत त्यांनी काम केला आहे त्यामुळे त्यांचा कामावरून संपर्क आहे इतकेच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2021 1:02 pm

Web Title: chandrakant patil slams uddhav thackeray government scsg 91
Next Stories
1 “आम्ही तेल प्रकल्प उभारले, सात वर्षात तुम्ही काय केलं”
2 धनंजय मुंडेंनी जाहीर कार्यक्रमात सांगितली राजाची गोष्ट, म्हणाले ‘देव करतो, ते भल्यासाठीच करतो!’
3 माघी एकादशीलाही विठू माऊली एकटीच! पंढरपुरात संचारबंदी
Just Now!
X