04 August 2020

News Flash

कोपर्डी बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साक्षीदार ?

एका वर्तमानपत्राच्या संपादकांचेही नाव साक्षीदारांच्या यादीत समाविष्ट आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)

कोपर्डी बलात्कार प्रकरणी न्यायालयात जवाब नोंदवण्याचे काम सुरू असून बचाव पक्षाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साक्षीदार म्हणून बोलावण्याची मागणी केली आहे. या यादीत फडणवीस यांच्या नावाबरोबरच एका वर्तमानपत्राच्या संपादकांचेही नाव साक्षीदारांच्या यादीत समाविष्ट आहे.

बचाव पक्षाचे वकील प्रकाश अहेर यांनी साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली. विधानसभेत आणि एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आरोपीला फाशी देणार असल्याचे विधान मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे नाव साक्षीदारांच्या यादीत समाविष्ट केले आहे. या अर्जावर ७ जुलैला सुनावणी होणार असून

कोपर्डी बलात्कारप्रकरणी बचाव पक्षाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साक्षीला बोलावण्याची तयारी केली आहे. बचावपक्षाच्या वकिलांनी साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचंही नाव घेतलं आहे. यातील तिसरा आरोपी नितीन भैलुमेने न्यायालयात आपल्यावरील सगळे आरोप नाकारले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2017 6:36 pm

Web Title: cm devendra fadnavis name include in kopardi rape case as a witness
Next Stories
1 मुख्यमंत्री फडणवीस-शरद पवारांमध्ये ‘कर्जमाफी पे चर्चा’
2 मुख्यमंत्री-गडकरींसाठी राणे ‘स्वागतोत्सुक’
3 पंढरपूरच्या सरकारी रुग्णालयात बेवारस मृतदेह पोत्यात
Just Now!
X