पुण्यात सतीश मिसाळ एज्युकेशन फाउंडेशनच्या ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा पहिला पदवीदान समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचा सत्कार करताना माधुरी मिसाळ त्यांना पुष्पगुच्छ देत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या पुष्पगुच्छाला प्लास्टिकचे आवरण असल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी तो पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार दिला. या कृतीतून मुख्यमंत्र्यांनी त्यांची प्लास्टिक बंदीबाबत असलेली सर्तकता-जागरुकता दाखवून दिली.

यापूर्वी काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकचा संबंध असलेल्या भेटवस्तू स्वीकारल्याने राजकीय नेत्यांवर टीका झाल्या आहेत. ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या कार्यक्रमाला महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, महापौर मुक्ता टिळक आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन कलमळकर तसेच भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis refuse to accept flowers bouquet
First published on: 20-10-2018 at 12:10 IST