वायदे बाजारात समावेशच्या शक्यतेने दरवाढ

हरभराडाळीचा समावेश वायदे बाजारात होण्याच्या शक्यतेने दहा दिवसांत डाळीचे दर २५ टक्क्यांनी वाढले आहेत. बाजारातील हरभरा डाळीचे दर गेल्या पंधरा दिवसांमध्ये एका क्विंटलमागे ५ हजार ८०० रुपयांहून ७ हजार ८००वर पोहोचले आहेत.

सांगलीच्या बाजारात नवीन हरभरा बाजारात येताच दर उतरले होते. दहा दिवसांपूर्वी हरभराडाळीचा दर ५ हजार ८०० रुपये िक्वटलवर आला होता. नवीन हरभरा बाजारात येऊ लागताच तयार हरभरा पिकाचा दर िक्वटलला ३ हजार ८०० रुपयांवर आला होता. या हरभऱ्यापासून तयार करण्यात येणारी डाळ बाजारात क्विंटलला ५ हजार ८०० ते सहा हजार या दराने विकली जात होती. मागील वर्षी ऐन दिवाळी दसऱ्याला १२ हजार ते १३ हजार ५०० रुपयांवर गेलेला दर नवीन हरभरा पीक येताच निम्म्यावर आले होते.

मात्र गुढीपाडव्यानंतर सुरू होत असलेल्या लग्नसराईच्या हंगामातच बाजारात हरभराडाळीचा समावेश वायदे बाजारात होण्याच्या शक्यतेने दर वाढत आहेत. गेल्या दहा दिवसांत डाळीच्या दरात िक्वटलला दोन हजार रुपयांनी दर वाढला असल्याचे सांगलीतील पद्मावती ट्रेडर्सचे विवेक शेटे यांनी सांगितले. याचबरोबर मूगडाळीचा दरही ५ हजार ८०० वरून ७ हजार २०० रुपयांवर गेला आहे. तूरडाळीचे दर मात्र या वर्षी स्थिर असून सांगलीच्या बाजारात तूरडाळीचे दर ६ हजार २०० ते ६ हजार ८०० रुपये असे आहेत. उडीदडाळीचा दर १० हजार ५०० रुपये आहे.ोरात समावेशच्या शक्यतेने दरवाढ