18 January 2021

News Flash

Coronavirus : नवी मुंबईत दिवसभरात १०५ नवे पॉझिटिव्ह, चार जणांचा मृत्यू

करोनाचे आतापर्यंत १८ बळी, करोनाबाधितांची एकूण संख्या ७७९ वर

प्रतिकात्मक छायाचित्र

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात झपाट्याने वाढत आहे. नवी मुंबईतही सातत्याने करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून सोमवारी दिवसभरात  शहरात सर्वात अधिक १०५ करोनाबाधित सापडले आहेत. शहरात करोनाबाधितांची संख्या ७७९ झाली असून आज ४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनामुळे शहरातील मृतांचा एकूण आकडा १८ झाला आहे.

शहरात सोमवारी बेलापूरमध्ये ४,नेरुळमध्ये ८ तुर्भे ३४, वाशीत ४, कोपरखैरणेत ३०,घणसोलीत १६, ऐरोलीत ५, व दिघा येथे ४ अशी दिवसभरात १०५ रुग्णांची वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात १२३० नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर करोनाची लागण झाल्याने २४ तासात ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या २३ हजार ४०१ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन ८६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 9:50 pm

Web Title: coronavirus 105 new positives four deaths in navi mumbai msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्रात १२३० नवे करोना रुग्ण, ३६ मृत्यू, संख्या २३ हजार ४०० च्या पुढे
2 लॉकडाउनचं काय? लोकल रेल्वे सुरु होणार का ?….उद्धव ठाकरेंनी मोदींकडे केल्या ‘या’ मागण्या
3 मातृदिनीच माकडीणीने पिल्लाला नाकारले
Just Now!
X