राज्यात करोनाचा प्रादर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात देखील दररोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. आज शहरात नवे तीन रुग्ण आढळल्याने औरंगाबदकरांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. तर, शहरातील करोनाबाधितांचा आकडा आता 28 वर पोहचला आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबाद देखील रेड झोनमध्ये आहे.

आज समोर आलेल्या रुग्णांमध्ये एका गर्भवती महिलेचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. महत्वाची बाब म्हणजे ही महिला नऊ महिन्यांची गर्भवती असून तिची प्रसुती सायंकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे. रुग्णालय प्रशासन आता या महिलेच्या प्रसुतीसाठी अधिकच सज्ज झाले आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पार, एकाच दिवशी वाढले १६५ पॉझिटिव्ह रुग्ण

महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी दुपारपर्यंत आणखी १६५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून आता महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पुढे गेली आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ८१ झाली आहे. राज्यातील ११ जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. शिवाय ३ जिल्ह्यांतील काही भाग हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. लॉकडाउननंतरही अद्याप राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येतील वाढ थांबत नाही, ही चिंतेची बाब मानली जात आहे.

आणखी वाचा- Coronavirus: सोलापूरात एका नर्समुळे १० जणांना झाली करोनाची लागण

बुधवारी महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन ९ मृत्यू झाले होते. शिवाय बुधवारी एकाच दिवशी २३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले होते. गुरुवारी त्यात आणखी १६५ जणांची भर पडली आहे.