वर्धा येथे  महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्यावतीनं जमा करण्यात आलेल्या निधीद्वारे गरजू नागरिकांना धान्य पाकीटाचे वाटप करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाला 7 किलो तांदुळ, 1 किलो डाळ, 1 किलो साखर, 5 किलो कणिक व 1 किलो मीठ अशी मदत देण्यात आली.

विद्यापीठाला  लागून गिरिपेठ, हनुमान गढ़, कारला चौक, आर्वी नाका हा परिसर असून या परिसरातील 150 हून अधिक मजुरांना ही मदत  देण्यात आली. रविवारी या सामग्रीचे वितरण करण्यात आले. हे कार्य प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करत पार पडले. कुलगुरु  रजनीश कुमार शुक्ल यांच्या मार्गदर्शनातून कर्मचारी, प्राध्यापक व विद्यार्थी यांनी 40 हजार रुपये जमवून धान्य व जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या. या कामात कुलदीप पाण्डेय,  प्राध्यापक जितेंद्र , श्रीकांत , विद्यार्थी पुनेश जी व गौरव कुमार यांनी सहकार्य केले.

वित्त विभागातील अनुभाग अधिकारी कमल शर्मा यांच्या नेतृत्वात सामानाची पाकीटं गरजुंना देण्यात आली. वितरण करतेवेळी सोशल डिस्टंसिंग व सेनिटाइज़िंगच्या नियमांचे विशेष पालन करण्यात आले. परीक्षा विभागातील सहायक कुलसचिव कौशल किशोर त्रिपाठी व इतर कर्मचारी यांनी महत्वाचे योगदान दिले. कोरोना संकटामुळे देशात लॉकडाउन असून या कारणाने मजुर व रोजंदारीवर उदरनिर्वाह करणारे प्रभावित होत आहेत.

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठानजिक गिरिपेठ, हनुमान गढ़, कारला चौक, आर्वी नाका ही वस्ती असून या परिसरात मजुरांचे प्रमाण मोठे आहे. काम नसल्याने त्यांच्या समोर उदरनिर्वाह करण्याची समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत एक नागरिक म्हणून संकट काळात आम्ही त्यांच्या सोबत आहोत, खारीचा वाटा म्हणून नागरिकता  धर्म निभवत आहोत, अशी भावना विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी व्यक्त केली.