News Flash

रुग्णसंख्येत घट, करोनाबळींमध्ये वाढ

मृतांमधील ४१५ मृत्यू हे गेल्या ४८ तासांतील असून, त्यांची नोंद रविवारी झाली.

राज्यातील रुग्णसंख्येचा आलेख घसरू लागला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात करोनाचे ३४,३८९ नवे रुग्ण आढळले. मात्र, करोनाबळींची संख्या वाढली आहे. याच कालावधीत ९७४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. ही आतापर्यंतची सर्वाधिक मृत्युसंख्या आहे.

मृतांमधील ४१५ मृत्यू हे गेल्या ४८ तासांतील असून, त्यांची नोंद रविवारी झाली. मृतांमध्ये मुंबई ६०, रायगड जिल्हा ३०, ठाणे जिल्हा २७, नाशिक जिल्हा ४२, जळगाव ३१, पुणे जिल्हा ६२, सोलापूर जिल्हा ८५, कोल्हापूर जिल्हा ९८, औरंगाबाद ४५, नांदेड ४३, विदर्भ २४१ रुग्णांचा समावेश आहे. त्यापैकी नागपूर जिल्ह्य़ात १०४ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्युदर हा सरासरी १.५२ टक्के  आहे. राज्यातील आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही ८१,४८६ झाली.

राज्यात करोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असून, नव्या रुग्णांपेक्षा अधिक जण करोनामुक्त होत आहेत. दिवसभरात ५९,३१८ रुग्ण करोनामुक्त झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 2:03 am

Web Title: despite falling covid 19 cases death figures remain high in maharashtra zws 70
Next Stories
1 सोलापूर, पंढरपुरात ढगाळ वातावरण
2 सांगलीत पावसाची हजेरी
3 पंतप्रधानांना पत्र लिहिल्यानेच राज्याला सर्वाधिक मदत -देवेंद्र फडणवीस
Just Now!
X