News Flash

धनंजय मुंडेंनी बारामतीत पवार कुटुंबीयांसह साजरा केला वाढदिवस

शरद पवार आमचे आधारवड

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी बारामतीत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केक आणला, जो पवारसाहेबांनी भरवला याचा आपल्याला आनंद आहे असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले धनंजय मुंडे?
करोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येथे आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेतली. सुप्रिया सुळेताईंनी काल झालेल्या वाढदिवसानिमित्त केक आणला. राष्ट्रवादी हे कुटुंब आहे. या कुटुंबाचा आधारवड कायम कुटुंबासाठी भक्कम उभा असतो. धन्यवाद साहेब, ताई असाच आशीर्वाद असूद्या

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 7:12 pm

Web Title: dhananjay munde celebrate his birthday with sharad pawar and family in baramati scj 81
टॅग : Dhananjay Munde
Next Stories
1 Coronavirus : करोनामुक्त तालुक्यात सापडला रूग्ण
2 राज्यातील आरोग्य यंत्रणांच्या उपाययोजनांमुळेच माता मृत्यू रोखण्यात सातत्य – आरोग्यमंत्री
3 १५ दिवस मादी बिबट न आल्याने बकरीचं दूध पाजून बछड्यांचे संगोपन
Just Now!
X