भाजप सेनेला लाज वाटायला हवी या राज्यात राज्य करताना, १६ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे घोटाळे पुराव्यानिशी बाहेर काढले. अरे लाज विकून खाल्लीय या सरकारने अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चाळीसगावच्या जाहीर सभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

२०१४ मध्ये आजची तरुणाई हरहरमोदी घरघर मोदी म्हणत होती आणि आज तीच तरुणाई गळी गळी में शोर है चौकीदार चोर है… आणि आता विचारलं तर साडेचार वर्षांत साधी सोयरीकही झाली नाही असं सांगत आहे. अशा शब्दात राज्यातील तरुणाईचा उडालेला गोंधळ चाळीसगावच्या सभेत मांडला. देश बदलतोय की नाही माहित नाही परंतु आता हा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय होतोय, परिवर्तन होतेय असेही धनंजय मुंडे म्हणाले. आता पुन्हा वेगवेगळी आश्वासने.. स्वप्न दाखवतील परंतु मालिकेच्या अगोदर किंवा सिनेमाच्या अगोदर ही कथा काल्पनिक आहे अशी सूचना येते त्याप्रमाणे यांची भाषणे काल्पनिक असतील हे लक्षात ठेवा असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

पराभवाच्या मानसिकतेमधून घोषणांचा महापूर-जयंतराव पाटील

पराभवाची मानसिकता झाल्याने घोषणांचा महापूर यांच्याकडून सुरु झाला आहे. अरे बाबांनो आता सुचलंय का हे शहाणपण सुचलं का अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी चाळीसगाव च्या जाहीर सभेत भाजपाचा समाचार घेतला. आमदार जयंतराव पाटील यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला एलीडी स्क्रीन वर भाजप सरकार आणि त्यांच्या घोषणा व त्यांच्या मंत्र्यांचे घोटाळे लोकांसमोर मांडले.

या सभेत महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राजू देशमुख यांनी आपले विचार मांडले. या सभेच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांनी भव्य मोटारसायकल रॅली काढली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या दुसर्‍या टप्प्यातील सभेला माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,सेवादल प्रदेशाध्यक्ष दिपक मानकर,विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, जिल्हाध्यक्ष नानासाहेब पगार,महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बेलकवडे जलसिंचन सेलचे राजेंद्र जाधव आदींसह चाळीसगाव येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.