News Flash

दुष्काळी भागात बांधकामांसाठी तूर्त पाणी देऊ नका, हायकोर्टाचे आदेश

संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये तीव्र दुष्काळी स्थिती आहे

मुंबई हायकोर्ट (संग्रहित छायाचित्र)

राज्यातील दुष्काळी भागामध्ये तूर्त बांधकामांसाठी पाणी पुरविण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये तीव्र दुष्काळी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर या भागात सुरू असलेल्या बांधकामांना दिल्या जाणाऱ्या पाण्याचा पुरवठा तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एक जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने हे आदेश दिले.
राज्यातील दुष्काळी भागामधील पाण्याचा कोणताही स्रोत खासगी राहू शकत नाही. धरणांमध्ये आणि विहिरींमध्ये जे पाणी शिल्लक आहे. त्याचा वापर प्राधान्याने फक्त पिण्यासाठीच केला जावा. इतर कोणत्याही कारणांसाठी तूर्ततरी पाणी देण्यात येऊ नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. नव्या किंवा जुन्या बांधकामांसाठी पाणी देण्यात येऊ नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2016 2:36 pm

Web Title: do not provide water for construction in drought affected districts
Next Stories
1 मद्यनिर्मिती कारखान्याच्या पाणीपुरवठ्यावर बंदी घालण्याची याचिका फेटाळली
2 शहीद पांडुरंग गावडेंच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
3 राज्यपालांच्या दबावाखाली सरकारचे काम !
Just Now!
X