News Flash

शॉवरमधून करंट उतरल्याने नाशिकमध्ये डॉक्टरचा मृत्यू

नंदुरबारमधील तळोदा हे आशिष यांचे मूळ गाव

आंघोळ करताना मृत्यू झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? मात्र नाशिकमध्ये एका तरूण डॉक्टरचा मृत्यू शॉवर घेताना झाला. शॉवरमधून करंट उतरला आणि या डॉक्टरचा मृत्यू झाला. आशिष काकडे असे या डॉक्टरचे नाव आहे. गंगापूर रोडवरील इंद्रपस्थ सोसायटीत आशिष काकडे राहात होते. दुपारच्या सुमारास आशिष काकडे यांच्या घरातून पाणी येत असल्याचे सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांच्या लक्षात आले. त्यानंतर शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता डॉक्टर आशिष बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आले. या संदर्भात तातडीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन डॉक्टर काकडे यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालातच डॉक्टर काकडे यांचा मृत्यू शॉक लागून झाल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टर आशिष काकडे तळोदा येथील आहेत. त्यांचे आई वडिलही डॉक्टरच आहेत. आशिष काकडे नाशिकच्या मोतिवाला महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस घटनास्थळी आले. डॉक्टर काकडे यांच्या मृतदेहावर ठिकठिकाणी भाजल्याच्या खुणा होत्या. डॉक्टर काकडे यांचा मृत्यू पहाटेच्या वेळी अंघोळ करताना झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नंदुरबारमधील तळोदा हे त्यांचे मूळ गाव आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 1:42 pm

Web Title: doctors death due to shock from shower in nashik
Next Stories
1 काळजाचा थरकाप उडवणारे सोनईचे तिहेरी हत्याकांड
2 जगभरातील बेने इस्रायली अलिबागमध्ये!
3 सोलापूरमध्ये वस्त्रोद्योगाने भरारी घेण्यासाठी पंखांचे बळ हवे!
Just Now!
X