News Flash

डाॅ. दाभोलकर खून प्रकरण : आणखी दोन आरोपींना जामिन

सीबीआयने अटक केलेल्या औरंगाबादच्या अजिंक्य आणि शुभम सुरळे या दोन्ही भावांना जामिन मंजूर

डाॅ.नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात हत्यार बाळगल्या प्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या औरंगाबादच्या अजिंक्य आणि शुभम सुरळे या दोन्ही भावांना ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिन मंजुर करण्यात आला.

नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाशी सुरळे बंधूचा संबंध नसल्याचे तपासात स्पष्ट झाल्याची लेखी माहिती खंडपीठाला सीबीआयने दिली. या प्रकरणात गेल्या २२ ऑगस्ट रोजी सिटी चौक पोलीस ठाण्यात शुभम आणि अजिंक्य सुरळेवर गुन्हा दाखल झाला होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार अटकेत असलेला सचिन अणदूरे याने त्याचे मेव्हणे अजिंक्य आणि शुभम यांना पिस्तूल लपवून ठेवण्यास सांगितले होते. या आरोपाचे खंडन करत सुरळे कुटुंबांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळल्यामुळै या निर्णयाविरोधात सुरळे यांनी खंडपीठात जामिनासाठी धाव घेतली होती.

सध्या सुरळे बंधू न्यायालयीन कोठडीत आहे. दर सोमवारी सिटीचौक पोलिस ठाण्यात हजरी, इतर साक्षीदारांवर दबाव न आणणे अशा अटींवर त्यांना जामिन मंजूर केल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 1:30 pm

Web Title: dr narendra dabholkar murder case more two accused surale brothers got bail from court
Next Stories
1 सरकारने अण्णांच्या जीवाशी खेळू नये : उद्धव ठाकरे
2 बाळासाहेबांविरोधात पोस्ट केल्याने सरपंचाला जीवे मारण्याचा प्रयत्न, दिडशे शिवसैनिकांविरुध्द गुन्हा
3 उपोषणाचा पाचवा दिवस, अण्णांची प्रकृती ढासळली
Just Now!
X