घराला घरपण मिळवून देणारी माणस अशी जाहिरात करून कोट्यवधी रुपये किमतीची घरे बांधणाऱ्या डीएसकेंना स्वत:च्या घरात भाड्याने राहण्याची वेळ आली आहे. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या डीएसकेंचा पुण्यातील बंगला ईडीने जप्त केल्याने या बंगल्यात राहण्यासाठी भाडे देण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. यासाठी डीएसकेंनी सत्र न्यायालयात धाव घेत अपील दाखल करुन दरमहा भाडे भरण्याची तयारी दाखवली आहे.

दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके यांना हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर ईडीने डीएसकेंचा पुण्यातील ‘डीएसके व्हिला’ जवळपास 11 कोटी रुपये किंमतीचा 355 चौमीचा बंगला जप्त केला होता. डीएसके यांना या बंगल्यात राहायचं असल्यास बाजार मुल्याप्रमाणे 11 लाख रुपये दर महिना भाडे द्यावे लागेल असे न्यायालयाने याबाबत स्पष्ट केले होते. याबाबत न्यायालयाने डीएसकेंना 10 दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. ही मुदत 25 सप्टेंबर रोजी संपल्याने ईडीने बंगला ताब्यात घेतला. त्यानंतर आता डीएसकेंनी न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल केली असून या याचिकेवर न्यायमूर्ती एस.एस.शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ईडीने रेडी रेकनर दराने 11 लाख रूपये भाड्याची मागणी केली. अखेर डीएसकेंनी दरमहा 11 लाख रूपये भाडे देण्याची तयारी दर्शवली आहे.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच