महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ईडीनं याआधीच अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. त्यासोबतच त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला देखील चौकशीसाठी ईडीनं समन्स बजावले असताना आता त्यांच्यावर ईडीनं मोठी कारवाई केली आहे. अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपये किंमतीची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही मालमत्ता अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे. मुंबई आणि नागपूरमधील ही मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

 

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

अनिल देशमुख यांना आत्तापर्यंत तीन वेळा ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. तसेच, अनिल देशमुख यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला देखील अशाच प्रकारचे चौकशीसाठीचे समन्स बजावण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानी ईडीकडून छापे टाकण्यात आले होते. दिवसभर ही कारवाई झाल्यानंतर संध्याकाळी माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरच आरोप केले होते.

नेमका कसा झाला गैरव्यवहार?

ईडीनं आज जप्त करण्यात आलेल्या ४ कोटी २० लाखांच्या मालमत्तेमध्ये त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी आरती देशमुख आणि प्रिमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संपत्तीचा समावेश आहे. यामध्ये वरळीतील १ कोटी ५४ लाख रुपयांचा फ्लॅट आणि २ कोटी ६७ लाख रुपये किंमतीची रायगडच्या उरणमधील जमीन यांचा समावेश आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्या मदतीने मुंबईतील बारचालकांकडून अवैधरीत्या ४ कोटी ७० लाख रुपये जमा केले. तसेच, दिल्लीतील एका बनावट कंपनीच्या माध्यमातून अनिल देशमुख यांनी ४ कोटी १८ लाख रुपये जमवले असून ते श्री साई शिक्षण संस्था या ट्रस्टमध्ये आल्याचं भासवलं, असं ईडीकडून सांगतण्यात आलं आहे.

व्यवहार झाल्यानंतर १६ वर्षांनी केली कागदपत्र!

आज जप्त करण्यात आलेला वरळीमधील फ्लॅट अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावाने रजिस्टर असून २००४ मध्ये या फ्लॅटची पूर्ण रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली होती. मात्र, तरीदेखील त्याचं विक्रीखत थेट फेब्रुवारी २०२०मध्ये करण्यात आलं. अनिल देशमुख यावेळी राज्याचे गृहमंत्री होते. तसेच, अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रिमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ५० टक्के मालकी अवघ्या १७.९५ लाख रुपयांना खरेदी केली. मात्र, त्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास ५ कोटी ३४ लाखांच्या घरात आहे, असं देखील ईडीकडून सांगण्यात आलं आहे.

‘देशमुखांवरील आरोपांची चौकशी करण्यास परमबीर यांना कोणी रोखले होते?’

“अनिल देशमुखांना अटक होणार”

“ही तर सुरुवात आहे. माझ्या माहितीप्रमाणे १०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती ईडीकडे आली आहे. आज ४ कोटी जप्त झाले आहेत, येत्या काही दिवसांमध्ये ते १०० कोटींपर्यंत जाणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ईडी अनिल देशमुखांना अटक करेल”, असा दावा या कारवाईनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.