News Flash

आमदार वैभव नाईक यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल

कुडाळ येथे शनिवारी शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांंमध्ये जोरदार खडाजंगी उडाली होती.

आमदार वैभव नाईक यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल

सावंतवाडी : कुडाळ येथे शनिवारी शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांंमध्ये जोरदार खडाजंगी उडाली होती. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुडाळ येथे शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कुडाळ शहराच्या मध्यवर्ती असलेल्या पेट्रोल पंपवर १०० रुपयांत प्रति वाहन दोन लिटर पेट्रोल तर भाजप सदस्यांचे ओळखपत्र दाखवणाऱ्याला १ लिटर मोफत पेट्रोल देणार असल्याचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केले होते. त्यानंतर शिवसेना भाजप कार्यकर्त्यांंनी जोरदार घोषणाबाजी करत राडा करण्याचा प्रयत्न झाला होता.   शनिवारी सकाळी आमदार वैभव नाईक व त्याचे कार्यकर्ते भारत पेट्रोल पंपवर आल्यानंतर भाजप सेना कार्यकर्त्यांंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे वातावरण तंग झाले.  यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदीचे उल्लंघन केले. याप्रकरणी सेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह सेना भाजपच्या ४० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,अशी माहिती पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 12:09 am

Web Title: fir registered against 40 persons including mla vaibhav naik zws 70
Next Stories
1 प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
2 Corona Update: राज्यात करोना रुग्ण संख्येत घट; रिकव्हरी रेट ९५.७६ टक्क्यांवर
3 “…तर मुंडे साहेब रस्त्यावर उतरले असते”, वंचितांच्या प्रश्नावरून पंकजा मुंडेंनी व्यक्त केल्या भावना
Just Now!
X