News Flash

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पियोचा अपघात, ५ जण जागीच ठार

भीषण अपघातात दोनजण जखमी

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज या ठिकाणी स्कॉर्पियो गाडीचा अपघात झाल्याने ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण जखमी झाले आहेत अशी माहिती मिळते आहे. स्कॉर्पियो (क्रमांक एम.एच. २० एजी ०९३९) या स्कॉर्पियो गाडीचा टायर फुटला. त्यामुळे ही गाडी उलटून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या गाडीने या स्कॉर्पियोला उडवले. या भीषण अपघातामुळे ५ जण ठार झाले आहेत. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत.  जखमी झालेल्या दोघांना भिगवण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला,दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे असेही समजते आहे.

मृतांची नावे
प्रकाश रामचंद्र गायकवाड (वय ६७)
सुनिता प्रकाश गायकवाड (वय ५८)
संदीप प्रकाश गायकवाड (वय ४०)
शितल संदीप गायकवाड (वय ३२)
आभिराज संदीप गायकवाड (वय ५)

हे सगळे जण नाना-नानी पार्क यमुनानगर निगडी येथील रहिवासी होते

 

जखमींची नावे
प्रमोद प्रकाश गायकवाड (वय ३०)
हेमलता प्रमोद गायकवाड (२८)

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 7:34 pm

Web Title: five people killed in road accident on pune solapur road
Next Stories
1 पती- पत्नीच्या भांडणात गर्भवती मेहुणीची हत्या
2 इतर अवाजवी वीजबिल आल्यास धास्तावू नका, महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधा!
3 युती न झाल्यास एकटे लढून स्वबळावर सत्ता मिळवू
Just Now!
X