राज्यासह देशभरात सलग अकराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली असून मुंबईत पेट्रोलच्या दराने लिटरमागे ८५. २९ रुपयांचा तर डिझेलने लिटरमागे ७२. ९६ रुपयांचा आकडा गाठला आहे. राज्यात परभणी, अमरावती या शहरांमधील पेट्रोल सर्वात महाग असून या शहरांमध्ये पेट्रोलचे दर ८७ रुपयांच्याजवळ पोहोचले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या दरात वाढ झाल्याने भारतात सध्या पेट्रोल आणि डिझेल महागले आहेत. केंद्र सरकार यावर तोडगा काढण्यात अपयशी ठरत असून इंधन दरवाढीमुळे महागाई देखील वाढली आहे. मालवाहतुकीचा खर्च वाढल्याने भाजीपाला देखील महागला असून याचा थेट फटका स्वयंपाकघराला बसला आहे.

देशभरात पेट्रोल व डिझेलच्या दरांवरुन नाराजी असून राज्यात पेट्रोल व डिझेलवरील व्हॅटमुळे दर गगनाला भिडले आहेत. राज्यात इंधनावर तब्बल ४६. ५२ टक्के व्हॅट असून तो कमी केल्यास दर कमी होईल व सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.

राज्यातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल व डिझेलचे दर. (दर प्रतिलिटरनुसार असून प्रत्यक्षात पेट्रोल पंपावर किंमतीमध्ये काही तफावत येऊ शकते)

> मुंबई
पेट्रोल –  ८५. २९ रुपये
डिझेल –  ७२.९६ रुपये

> पुणे
पेट्रोल – ८५.०९ रुपये
डिझेल – ७१. ६६ रुपये

> नाशिक
पेट्रोल ८५. ६२ रुपये
डिझेल ७२. १८ रुपये

> जळगाव
पेट्रोल – ८६. १९ रुपये
डिझेल – ७२. ७३ रुपये

> अमरावती<br />पेट्रोल ८६. ४८ रुपये
डिझेल – ७४. १९ रुपये

> नागपूर
पेट्रोल – ८५. ७७ रुपये
डिझेल – ७३. ४९ रुपये

> चंद्रपूर
पेट्रोल – ८५. २९ रुपये
डिझेल – ७१. ९१ रुपये

> औरंगाबाद<br />पेट्रोल – ८६. २७ रुपये
डिझेल – ७३. ९५ रुपये

> नांदेड
पेट्रोल – ८६. ७६ रुपये
डिझेल – ७३. २८  रुपये

> परभणी
पेट्रोल – ८६. ९७ रुपये
डिझेल – ७३. ४८ रुपये

> कोल्हापूर<br />पेट्रोल – ८५. ४७ रुपये
डिझेल – ७२. ०५ रुपये

> सातारा
पेट्रोल – ८५. ७६ रुपये

डिझेल – ७२. ३१ रुपये

> सिंधुदुर्ग
पेट्रोल – ८६. १३ रुपये
डिझेल – ७२. ६९ रुपये

> रत्नागिरी
पेट्रोल – ८६. २४ रुपये
डिझेल – ७२. ८० रुपये

> अलिबाग
पेट्रोल –  ८५. ३१ रुपये
डिझेल –  ७१. ८६ रुपये

> पिंपरी चिंचवड
पेट्रोल – ८५. २१ रुपये
डिझेल – ७१. ७३ रुपये

> नवी मुंबई
पेट्रोल – ८५. ३५ रुपये
डिझेल – ७३. ०२ रुपये

(सौजन्य: इंडियनऑइल.इन)