गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचीही हजेरी

भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी उदयनराजे भोसलेंना बोलावून मंत्री केले तर मला खासदार करून छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान केल्याने बहीण म्हणून पंकजा मुंडे यांना कायम साथ देण्याची ग्वाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी वडिलांनंतर दिवंगत मुंडे यांनीच मला जवळ केले. मी कालही तुमचा होतो, आजही आहे आणि भविष्यातही बदल होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

Ajit Pawar On Navneet Rana
“नवनीत राणा यांच्या विजयासाठी…”; उपमुख्यमंत्री अजित पवार चुकून काय म्हणाले?
Tanaji Sawant News
तानाजी सावंतांचा अजित पवारांसमोरच मोठा इशारा; म्हणाले, “…तर आम्ही सहन करणार नाही”
dharashiv, show of strength dharashiv
धाराशिवच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप

गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त परळी जवळील गोपीनाथगडावर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मृती दिनाचा कार्यक्रम झाला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले आणि शाहू महाराजांचे वंशज कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे भोसले उपस्थित होते. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगताना उदयनराजे भोसले यांचा कंठ दाटून आला. ते म्हणाले, गोपीनाथ मुंडे हे लोकांच्या मनावर राज्य करणारे लोकराजे होते. ते माझे मित्र, तत्त्वज्ञानी आणि मार्गदर्शक होते. वडिलांनंतर मला त्यांनीच जवळ केले. त्यामुळे आज त्यांचा मुलगा म्हणून या ठिकाणी आलो आहे. युतीचे सरकार असताना मला स्वतहून बोलावून घेऊन मुंडेंनी मंत्री केले. असा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांसाठी संघर्ष करणारा नेता होणे नाही.

आपली कॉलर उडवण्याच्या पध्दतीबद्दल काही लोक टीकाटिप्पणी करतात मात्र मी कॉलर का उडवतो? दिवंगत मुंडे यांनीच सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या नेत्यालाच कॉलर उडवण्याचा अधिकार असल्याचे सांगितले होते. पदासाठी नेत्यांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र दिवंगत मुंडे यांनी छत्रपतींच्या घराण्यांचा स्वतहून सन्मान केल्याबद्दल उदयनराजे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले, मागच्या वर्षीही मी गोपीनाथगडावर आलो होतो. येथे येण्यासाठी आम्हाला निमंत्रणाची गरज नाही तो आमचा हक्क आहे. दिवंगत मुंडेंनी मला बोलावून घेऊन खासदार व्हावे असे सांगितले होते. छत्रपतींच्या घराण्यांचा सन्मान करण्याची भूमिका घेणारे गोपीनाथ मुंडे हे एकमेव नेते होते.

दोन छत्रपती पंकजांच्या पाठिशी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन छत्रपती भाऊ पंकजा यांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. गोपीनाथगडावर दोन्ही छत्रपतींनी एकत्र येऊन पाठबळ दिल्यामुळे आपण सामाजिक सेवेचा वसा चालवू अशी ग्वाही पंकजा मुंडे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही बाजूला आज दोन छत्रपती बसल्याकडे लक्ष वेधून त्यांनी समाधान व्यक्त केले.